SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): मोठ्या लोकांच्या ओळखीचा लाभ होईल. सर्वांना आनंदाने समजून घ्याल. नवीन मित्र जोडाल. नवीन वाहन घेण्याची इच्छा मनात रूजेल. आर्थिक दर्जा सुधारेल. सामाजिक कार्यात तुमची गोडी निर्माण होईल. मीडिया आणि आय.टी. क्षेत्रातील लोकांना आपल्या कार्यात यश मिळेल. भावंडांशी गैरसमज होतील. थोडे वाद होण्याची शक्यता आहे. नोकरीत सहकाऱ्यांना सांभाळून घ्या. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल.

वृषभ (Taurus): पित्ताचा त्रास जाणवेल. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. हातातील अधिकार वापरता येतील. रागावर नियंत्रण ठेवावे.व्यवसाय, व्यापारात यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. मीडिया क्षेत्रातील व्यक्तींना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. वैवाहिक जीवन आनंद कायम राहील. कागदपत्रे आणि मूल्यवान वस्तू जपून ठेवा. आर्थिक आवक चांगली राहील. आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन (Gemini) : मनातील अनामिक चिंता दूर साराव्यात. वेळेचे योग्य नियोजन करावे. अडथळ्यातून मार्ग काढावा. हजरजबाबीपणे वागाल. कमिशनच्या कामातून लाभ संभवतो. जोडीदार आणि मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कुठल्याही प्रकारच्या वादापासून दूर राहा. आरोग्याची काळजी घ्या. अडून राहिलेली कामे जोर धरतील. मनात आनंदी विचार राहतील. विरोधकांच्या कारवाया चालू राहतील.

कर्क (Cancer) : कागदपत्रे नीट जपून ठेवावीत. फसवणुकीपासून सावध राहावे. जामीनकीच्या व्यवहारात पडू नका. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. व्यावसायिक बदल लक्षात घ्यावेत. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. दाम्पत्यांमध्ये तणावाचे वातावरण राहील. भगवान श्री हनुमान देवाची पूजा करा. मात्र त्यांच्याशी वाद वाढवणे योग्य ठरणार नाही. व्यवसायात भरभराट होईल. महत्त्वाचे निर्णय घेताना जाणकारांचा सल्ला घ्या.

Advertisementसिंह (Leo) : कौटुंबिक खर्चाचा आवाका लक्षात घ्यावा. नातेवाईकांशी मतभेद संभवतात. डोळ्याची वेळोवेळी काळजी घ्यावी. गप्पांच्या ओघात जबाबदारी घेऊ नका. हस्त कलेला उठाव मिळेल.व्यवसायात यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. वातावरणात प्रसन्नता कायम राहील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन चांगले राहील. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. त्यांच्याकडे फार लक्ष देऊ नका.

कन्या (Virgo) : सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. कामाची दगदग वाढेल. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. क्षणिक आनंदाचा लाभ होईल. व्यापारात चांगला लाभ संभवतो. घरातील महत्त्वाच्या कामात व्यस्त व्हाल. आर्थिक लाभ होईल. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण राहील. मन प्रफुल्लित राहील. आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात विक्री चांगली राहील. फायदे होतील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. वाहन जपून चालवा. धार्मिक कार्यात भाग घ्याल.

तुळ (Libra) : गृहशांती महत्त्वाची आहे. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. पित्तविकार बळावू शकतात. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. मानसिक शांतता लाभेल. आर्थिक नियोजन करणं तुमच्यासाठी लाभदायक आहे. प्रलंबित कामं पूर्ण होतील. भगवान श्री गणेशाची पूजा करा. आरोग्य निरोगी राहील. हातून चांगली कामे होतील. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. व्यवसायात लाभ होईल. चोरी, नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या.

वृश्‍चिक (Scorpio) : जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. साहित्याची आवड जोपासता येईल. घरातील कामात व्यग्र राहाल. घरातील स्वच्छता काढली जाईल. मुलांशी जुळवून घ्यावे लागेल.व्यवसायात भागिदारी करण्यासाठी उत्तम योग आहे. उद्योग धंद्यात चांगले यश प्राप्त होईल. धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कुणाचे मन दुखावू नका. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. मित्र, जवळचे लोक भेटतील. घरी पाहुणे येतील. मुलांची प्रगती होईल.

Advertisementधनु (Sagittarius) : गैरसमजाला बळी पडू नका. कलागुणांना चांगला वाव मिळेल. मनाजोगी खरेदी करता येईल. तुमच्या कलेचे कौतुक केले जाईल. अति विचार करू नका. तुम्हाला कामात यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. लव्ह लाईफ यशस्वी राहील. तुम्हाला विवाहाचे अनेक प्रस्ताव मिळतील. दमाच्या रूग्णांना आरोग्याची काळजी घ्या. धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात सामान्य स्थिती राहील. एखाद्या कामात अडथळा येऊ शकतो. जीवनसाथीशी मतभेद होऊ शकतात.

मकर (Capricorn) : अचानक धनलाभ संभवतो. वारसाहक्काची कामे करता येतील. सासुरवाडीची मदत घेता येईल. काही कामे कमी श्रमात पार पडतील. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. तुमच्या प्रभावशाली वाणीच्या सहाय्याने सर्वांची मनं जिंकाल. उत्पन्नापेक्षा अधिक पैसे खर्च होतील. ठराविक कार्यात यश मिळेल.आर्थिक आवक चांगली राहील. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. गुंतवणूक करताना काळजी घ्या. वाहन जपून चालवा.

कुंभ (Aquarious) : मनाची विशालता दाखवाल. गायन, वादन कलेला चांगला प्रतिसाद मिळेल. शैक्षणिक कामात यश येईल. मनाची सहृदयता दाखवाल. चांगली कल्पनाशक्ति लाभेल. दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. मात्र, आरोग्याची काळजी घ्या. कोणत्याही कार्यातील तुमचा उत्साह दांडगा असेल. भाग्याची चांगली साथ राहील. मनात आनंदी विचार राहतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील.

मीन (Pisces) : आवाक्याबाहेर खर्च वाढू शकतो. हातातील कामात यश येईल. कौटुंबिक कार्यक्रम काढले जातील. लहान प्रवासाचा आनंद घ्याल. काही कामे खिळून पडतील.व्यवसायात असलेल्या स्पर्धेमुळे धावपळ वाढेल. विद्यार्थ्यांना चांगले यश प्राप्त होईल. व्यापाराच्या संदर्भातील कार्यात चांगला लाभ होईल. प्रवासासाठी दिवस शुभ आहे. आवडत्या छंदासाठी वेळ देता येईल. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. तुमच्या कामाचे कौतुक होईल.

Advertisement