SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पदवीधर तरुणांसाठी रिझर्व्ह बँकेत नोकरीची सुवर्णसंधी..! कसा, कुठे करणार अर्ज..?

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे.. भारतीय रिझर्व्ह बॅंकेत (RBI) विविध पदांसाठी बंपर भरती होत आहे. यानिमित्ताने केंद्रीय सरकारी कर्मचारी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ‘आरबीआय’मध्ये अधिकारी होण्याची संधी आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

‘आरबीआय’मध्ये होणाऱ्या नोकर भरतीबाबतची (RBI recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे.. या नोकर भरतीबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

एकूण जागा- 294

पदनिहाय जागा

Advertisement
  1. ग्रेड बी अधिकारी, ओपन कॅटेगिरी, 238 जागा
  2. ग्रेड बी अधिकारी, आर्थिक आणि निती अनुसंधान विभाग, 31 जागा
  3. ग्रेड बी अधिकारी सांख्यिकी आणि सूचना प्रबंध विभाग, 25 जागा
  4. सहायक प्रबंधक राजभाषा, 06 जागा
  5. सहाय्यक प्रबंधक, शिष्टाचार आणि सुरक्षा, 03 जागा

शैक्षणिक योग्यता
अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक. किमान 60 टक्के गुण असावेत. किमान 55 टक्के गुणांसह ‘पीजी’ उत्तीर्ण झालेले उमेदवारही अर्ज करू शकतात.

महत्त्वाच्या तारखा!

Advertisement

अर्ज दाखल करण्यास सुरुवात – 28 मार्च, 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 एप्रिल 2022

Advertisement

सामान्य अधिकारी पदासाठी परीक्षा (पेपर 1) : 28 मे, 2022
सामान्य अधिकारी पदासाठी परीक्षा (पेपर 2) : 25 जून, 2022
अधिकारी DEPR आणि DSIM (पेपर 1) : 2 जुलै, 2022
अधिकारी DEPR आणि DSIM (पेपर 2) : 6 जुलै, 2022

वयोमर्यादा – अर्ज करण्यास इच्छुक उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2022 रोजी 21 ते 30 वर्षांदरम्यान असावे.

Advertisement

येथे करा ऑनलाईन अर्ज – opportunities.rbi.org.in

सविस्तर माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा – rbi.org.in 

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement