SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता मोफत मिळणार 6 लाख रुपयांची कार, पेटीएमची धमाकेदार ऑफर लॉंच..!

भारतातील आघाडीची डिजिटल पेमेंट्स आणि वित्तीय सेवा कंपनी पेटीएमची (Paytm) मालकी धारण करणाऱ्या वन97 कम्युनिकेशन्स लिमिटेड या कंपनीने अलीकडेच धमाकेदार अशी ऑफर लॉंच केल्याचं समजतंय. जेथे युजर्स त्यांच्या कॅशबॅक पॉइण्ट्सचा लाभ घेत आकर्षक रिवॉड्स जिंकू शकतात.

पेटीएम युजर्स 100 कॅशबॅक पॉईण्ट्स खर्च करत जॅकपॉटमध्ये सहभाग घेऊ शकतात आणि बंपर बक्षीस 6 लाख रूपयांची आकर्षक नवीन कार जिंकण्याची संधी मिळवू शकतात. याशिवाय अनेक बक्षिसे कंपनी देत आहे.

Advertisement

कॅशबॅक पॉइण्ट्स हा पेटीएम युजर्ससाठी विशेष रिवॉड्स प्रोग्राम आहे. Paytm वर व्यवहार केल्याने वापरकर्त्यांना पेटीएम UPI, पेटीएम वॉलेट, पेटीएम पोस्टपेड, नेटबँकिंग, क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पैसे ट्रान्सफर, मोबाईल रिचार्ज केल्यानंतर किंवा युटिलिटी बिल पेमेंट केल्यानंतर कॅशबॅक पॉइंट सहज जिंकता येतात.

विविध जॅकपॉट्स ऑफर राबवत युजर्सना अनेक आकर्षक बक्षीसे देत आहे. जसे की, 6 लाख रुपये किमतीची कार, Apple iPhone 13, Oppo Smartphones, Leaf Headphones यासारख्या भव्य बक्षिसांसह इतर अनेक जॅकपॉट ऑफर करते. त्यामुळे ही बक्षिसे मिळविण्यासाठी ग्राहक अक्षरशः तुटून पडले आहेत.

Advertisement

पेटीएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र यादव (Narendra Yadav, Senior Vice President, Paytm) म्हणाले, “आम्ही आमचे ग्राहक व व्यापारी भागीदारांना विनासायास सर्वोत्तम डिजिटल पेमेण्ट्स देण्याचा प्रयत्न करतो. अनेक जॅकपॉट ऑफरसह आम्ही अधिकाधिक युजर्सना त्यांचे कॅशबॅक पॉइण्ट्स रिडिम करत त्यामधून लाभ घेण्यास प्रेरित करत आहोत, अशी आशा आहे, ” असं ते म्हणाले.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement