SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! केंद्राबरोबर राज्य सरकारनेही अखेर ‘तो’ निर्णय घेतलाच…!

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. गेल्या कित्येक दिवसांपासून केंद्रिय कर्मचारी एका महत्वाच्या निर्णयाची वाट पाहत होते.. अखेर मोदी सरकारने आज (ता. 30) ‘तो’ निर्णय घेतलाच.. विशेष म्हणजे, मोदी सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत ठाकरे सरकारनेही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ‘तो’ निर्णय घेतला..!

तो म्हणजे, अर्थातच ‘महागाई भत्ता’…! मोदी सरकारने केंद्रीय कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 31 टक्के महागाई भत्ता (Dearness allowance) मिळतो. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार केंद्र सरकारने त्यात 3 टक्क्यांची वाढ केली. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 34 टक्क्यांवर गेलाय.

Advertisement

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, केंद्र सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्त्यामध्ये सुधारणा करीत असते. मात्र, कोरोनामुळे काही दिवसांपासून मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखला होता.

कोरोना संसर्ग कमी झाल्यावर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 28 वरून 31 टक्क्यांपर्यंत वाढवला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यात 3 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ पूर्वलक्षी प्रभावाने जानेवारी ते जून 2022 पर्यंतसाठी असणार आहे. त्यानंतर पुढील महागाई भत्ता जुलै 2022 मध्ये मोजला जाणार आहे.

Advertisement

केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशातील सुमारे 48 लाख कर्मचारी आणि जवळपास 69 लाख पेन्शनधारकांना मिळणार आहे. सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2022 पासून वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळणार असून, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले..

राज्य सरकारकडूनही वाढ

Advertisement

दरम्यान, केंद्रिय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर राज्य सरकार हा निर्णय कधी घेतंय, याची उत्सुकता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागली होती. मात्र, राज्य सरकारनेही वेळ न दवडता, लगेच राज्य कर्मचाऱ्यांसाठी 3 टक्के महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला..

सातव्या वेतन आयोगानुसार, सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 28 वरुन 31 टक्क्यांवर नेला आहे. 1 जुलै, 2021 पासूनच्या थकबाकीसह या वाढीचा फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे.. मार्च-2022 च्या वेतनासोबत रोखीने हा वाढीव महागाई भत्ता देण्यात येणार आहे. राज्य शासकीय कर्मचारी, इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार असून, या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement