SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोनं झालं स्वस्त! वाचा सोने-चांदीचे आजचे ताजे दर..

गुढीपाडव्याचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यासाठी सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करायचे जर तुम्ही ठरवलं असेल तर सोने आणि चांदीच्या किंमती जाणून घेणे तुमच्यासाठी योग्य ठरेल. गेल्या दोन दिवसांच्या सोने-चांदीच्या किंमतीतील घसरणीनंतर आज बुधवारी पुन्हा वाढ झाली आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे जगात क्रूड ऑईल आणि भारतात सोन्या-चांदीच्या दरात जास्त अस्थिरता जाणवत आहे. रशिया युक्रेन युद्ध, महागाई आणि अन्य घटकांचा सोने-चांदीच्या दरावर परिणाम होत असल्याचे आता स्पष्ट दिसून येत आहे.

Advertisement

गुड रिटर्न्स वेबसाईनुसार, आज 22 कॅरेट सोन्याचा दर 100 रुपयांच्या घसरणीसह 47,650 रूपये तर, 24 कॅरेट सोन्याचा दर 120 रुपयांच्या घसरणीसह 51,980 रूपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

जाणून घ्या आजचे 22 कॅरेट व 24 कॅरेट सोन्याचे दर: (Gold-Silver Rate Today)

Advertisement

▪️ पुणे – 47,700 रुपये, 52030 रुपये
▪️ नाशिक – 47,700 रुपये, 52030 रुपये
▪️ मुंबई – 47650 रुपये, 51980 रुपये
▪️ नागपूर – 47,700 रुपये, 52030 रुपये

10 ग्रॅम चांदीचा दर: 10 ग्रॅम चांदीच्या किंमतीत आज 41 रुपयांची वाढ होऊन ती 721 रुपयांवर पोहोचली आहे.

Advertisement

वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. तुमच्या शहरांतील अचूक किंमत जाणून घेण्यासाठी स्थानिक ज्वेलर्सला संपर्क करा आणि सोने-चांदीचे दर जाणून घ्या.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement