SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोठी बातमी : कोविड निर्बंधाबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय, आरोग्यमंत्री टोपे यांचे महत्वाचे विधान..

राज्यातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे.. गुढी पाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर कोविड निर्बंधाबाबत ठाकरे सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.. ती म्हणजे, येत्या एक एप्रिलपासून राज्यातील सर्व निर्बध हटवले जाणार आहेत. मात्र, सोशल डिस्टन्स व मास्कचा वापर बंधनकारक असेल, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिली..

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी राज्यांना पत्र पाठवून निर्बंध शिथील करण्याच्या सूचना केल्या होत्या.. त्यानुसार ठाकरे सरकारने यापूर्वीच अनेक निर्बंध शिथील केले आहेत. त्यानंतर आता राज्यातील सगळे निर्बंध हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे..

Advertisement

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने रेल्वे, बस, मॉल्सबाबतचे निर्बंध शिथील करण्याच्या मागण्या होत होत्या. त्यावर सरकारने सकारात्मक विचार केला असून, येत्या 1 एप्रिलपासून कोरोनाचे सर्व निर्बंध काढण्यात येणार आहेत. मात्र, नागरिकांसाठी मास्क सक्ती कायम असून, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली..

मास्क वापरावाच लागेल…

Advertisement

ते म्हणाले, की “राज्यात कोरोनाचा कहर सुरु असताना, राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला होता. मात्र, आता तो मागे घेण्यात येणार आहे. त्यामुळे जनतेसाठी लागू करण्यात आलेले निर्बंधही हटणार आहेत. मात्र, नागरिकांना मास्क वापरणे अनिवार्य आहे. तसेच कोविड लसीकरण करण्याला नागरिकांनी प्राधान्य द्यावे..”

कोरोनाचा धोका संपलेला नाही. परदेशात कोरोनाची चौथी लाट आली असून, त्याचे परिणाम आपण पाहतो आहोत. त्यामुळे आगामी काळात सणवार साजरे करताना काळजी घ्या. सध्या तरी मास्कमुक्ती करणे शक्य नाही. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरलाच गेला पाहिजे. राज्यातील नागरिकांसाठी तेच हितकारक असल्याचे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले..

Advertisement

चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया व युरोपीय देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे जगभर चिंता व्यक्त होत आहे. त्याच वेळी भारतात कोरोनाचा धोका कमी झाल्याने कोरोनाचे निर्बंध शिथील करीत असल्याचे टोपे म्हणाले.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement