SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शरद पवारांच्या बाबतीत मोठी बातमी: दिल्लीत झाली मोठी घडामोड, पवारांसमोरच झाला तो ‘प्रस्ताव’ संमत!

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक काल दिल्लीत संपन्न झाली. त्यावरून असे दिसते की, उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर भाजपाला आव्हान देण्यासाठी विरोधकांकडून पुन्हा एकदा एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भारतातील सध्याच्या कठीण राजकीय काळात शरद पवार यांनी काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचे नेतृत्व करावे, असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

दिल्लीत मंगळवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत पर्यायी आघाडी उभी करण्याबाबत बराच वेळ चर्चा झाल्याचं समोर आलं आहे. महत्वाचं म्हणजे या बैठकीत शरद पवारदेखील उपस्थित होते . यावेळी एक मोठी घडामोड समोर आली आहे. विरोधकांची एकी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यातच आता शरद पवारांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचं (UPA) अध्यक्षपद घ्यावं, यासाठी प्रस्ताव संमत करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Advertisement

मेहबूब शेख यांनी या बैठकीत शरद पवार यांची ‘संयुक्त पुरोगामी आघाडी’ चे (UPA) अध्यक्ष म्हणून निवड करावी असा प्रस्ताव मांडला आणि तो एकमताने मंजूरही झाला आहे. आजच्या तारखेत देशातील सर्व बिगर-भाजप राजकीय पक्ष आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना शरद पवार एकत्र आणण्यासाठी मोठी भूमिका पार पाडतील असं मत अनेकांनी व्यक्त केलं आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपाला टक्कर देऊन रोखलं जाऊ शकतं, असं या ठरावात म्हटलं आहे.

“देशातील सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता शरद पवार यांनी काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचं राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करायला हवं. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे देशातील सध्याचे सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक असून संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री म्हणून त्यांचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. शरद पवार असे नेते आहेत ज्यांचे देशातील सर्व प्रादेशिक पक्षांसह काँग्रेससोबतसुद्धा चांगले संबंध आहेत. आता सध्याच्या घडीला देशातील अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत नाही आहे. असे पक्ष शरद पवार यांच्यामुळे एकत्र येऊ शकतील. अशा सर्व बाबी विचारात घेऊन त्यांच्याकडे विरोधी पक्षाचे नेतृत्व सोपवायला हवं,” असंही या ठरावात नमूद केलं गेलं आहे. आता या संमत झालेल्या ठरावानंतर काँग्रेस पक्ष आणि युपीएतील घटक पक्ष काय भूमिका घेतील हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे

Advertisement

शरद पवार यांनीही यावर प्रतिक्रिया देत म्हटलंय की, “भारतातील विचारसरणी नेहरु, गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद यांच्या सुंदर विचारसरणीपासून प्रेरित आहे. या सर्व महान लोकांना नहर्तला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. सध्या सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करणाऱ्या सरकार विरोधात केवळ युवा शक्तीच सत्य आणि एकजुटीच्या आधारे सामना करु शकते. भारताला स्वातंत्र्या मिळाल्यानंतर जवाहरलाल नेहरु, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशाला एक नवी दिशा दाखवली. तर राष्ट्रवादी काँग्रेसची मूळ विचारसरचणी एकच आहे, फक्त काम करण्याची पद्धत वेगळी आहे, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement