SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 30 मार्च 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

🎯 स्प्रेडइट – हेडलाईन्स, 30 मार्च 2022

 

Advertisement

✒️ IPL : राजस्थान रॉयल्सचा सनरायझर्सवर 61 धावांनी दणदणीत विजय, राजस्थान रॉयल्सने दिले होते SRH ला 211 धावांचं लक्ष्य, सनरायझर्सला 20 षटकात 7 बाद केवळ 149 धावाच करता आल्या

✒️ डिजिटल कर्ज देणार्‍या ॲप्सच्या विरोधात तक्रारी नोंदवण्यासाठी आरबीआयच्या पोर्टलवर जानेवारी 2020 ते मार्च 2021 मध्ये सुमारे 2,562 तक्रारी; अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची लोकसभेत माहिती

Advertisement

✒️ आयसीसीने यंदा महिलांच्या विश्वचषक स्पर्धेच्या बक्षीस रकमेचा आकडा वाढवण्याचा निर्णय, ही रक्कम 75 टक्के वाढवत आता बक्षिसाची रक्कम झाली 26.5 कोटी रुपये

✒️ सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर ‘आरआरआर’ सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार, नेटफ्लिक्सवर हिंदीमध्ये प्रदर्शित होणार तर ZEE 5 वर देखील इतर भाषांत येणार

Advertisement

✒️ आसाम व मेघालयात मंगळवारी 12 पैकी 6 ठिकाणांबाबत असलेल्या सीमावादावर समेट घडवून आणणाऱ्या दस्तऐवजावर सामंजस्य करार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती

✒️ बँकिंग घोटाळ्यांमुळं 7 वर्षात दररोज 100 कोटींचं नुकसान; महाराष्ट्र, दिल्ली, तेलंगणा, गुजरात, तामिळनाडूमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर – RBI

Advertisement

✒️ केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सोलापूर दौऱ्यावर, ते सोलापूर अक्कलकोट, सोलापूर ते सांगली आणि सोलापूर ते विजयपूर राष्ट्रीय महामार्गांचे लोकार्पण करणार

✒️ पुण्यातील कात्रज परिसरात गंधर्व लॉन्स जवळ गॅस सिलेंडरचे स्फोट, स्फोट होतानाचा एक व्हिडीओ झाला व्हायरल, कुणी जखमी किंवा जिवितहानी असल्याची अद्याप माहिती नाही

Advertisement

✒️ अजमल कसाब याला पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या शौर्याबद्दल महाराष्ट्र सरकारकडून बक्षीस मिळणार, त्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार

✒️ बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांची संख्या तब्बल 57.33 टक्क्यांनी वाढली, देशभरातील 10 कोटी 8 लाख गुंतवणूकदारांची खाती, 2 कोटी 8 लाख गुंतवणूकदार हे एकट्या महाराष्ट्रातील

Advertisement

✒️ यशने स्वतः सिनेमातील मुख्य पात्र रॉकी भाईचे संवाद लिहिलेत; ‘KGF Chapter 2 ‘ सिनेमाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांचा खुलासा
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement