SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सलमानच्या ‘तेरे नाम’चा सिक्वेल येतोय..? कशी असणार सिनेमाची कथा..?

‘तेरे नाम’.. बाॅलिवूडच्या भाईजान सलमान खानचा हटके चित्रपट.. 15 ऑगस्ट 2003 रोजी हा सिनेमा रिलिज झाला.. नि पाहता पाहता या चित्रपटाने तरुणाईला अक्षरक्ष: वेड लावलं.. सलमानने साकारलेला ‘राधे’ हा टपोरी हिरो जबरदस्त फेमस झाला.. त्याची हेअर स्टाईल तर भलतीच गाजली.. बाॅक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवण्यात हा सिनेमा कमालीचा यशस्वी ठरला..

इतकं सारं सांगण्याचं कारण म्हणजे, भाईजानच्या चाहत्यांसाठी एक ‘गुड न्यूज’ आहे.. लवकरच ‘तेरे नाम’ या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे समजते.. याबाबत खुद्द ‘तेरे नाम’ चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी माहिती दिली..

Advertisement

सतीश कौशिक काय म्हणाले..?
एका मुलाखतीत बोलताना दिग्दर्शक सतीश कौशिक म्हणाले, की ”सुरुवातीला ‘तेरे नाम’ चित्रपट करण्यास सलमान खान तयारच नव्हता.. सिनेमाची कथा चांगली असली, तरी माझी भूमिका चुकीचा संदेश देत असल्याचे त्याचं म्हणणं होतं. मात्र, नंतर तो हा चित्रपट करण्यास तयार झाला..”

‘तेरे नाम’च्या सिक्वेलबाबत ते म्हणाले, की “आताच्या काळात हा सिनेमा लोकांना कितपत आवडेल, याबाबत मी साशंक आहे. त्यासाठी वेगळा विचार करावा लागेल.. प्रेक्षकांना आता हा सिनेमा किती रुचेल, हे सांगता येणार नाही. सध्याच्या काळात ‘तेरे नाम’चा सिक्वेल काढणं, खूप मोठं जबाबदारीचं काम आहे..!”

Advertisement

कथानक डोक्यात..
“‘तेरे नाम-2’चे कथानक आपल्या डोक्यात आहे, पण याबाबत अद्याप आपण सलमान खानशीही बोललेलो नाहीत. अजून काहीही ठरलेलं नाही.. सिक्वेलमध्ये संपू्र्ण प्रेमकथा दाखवायची, की इतर काही महत्त्वाच्या घटनांचाही विचार करायचा, हे ठरवावं लागेल. ‘तेरे नाम’मधील तो वेडा प्रेमी कदाचित आता दाखवणं अनेकांना पटणार नाही..” असंही कौशिक म्हणाले.

दिग्दर्शक सतीश कौशिक ‘तेरे नाम’चा सिक्वेल कधी येणार, त्यात पुन्हा एकदा सलमानच ‘राधे’ असणार, की दुसरा अभिनेता ही भूमिका साकारेल.., तसेच साध्या भोळ्या ‘निर्जरा’च्या (भुमिका चावलाच्या जागी) भूमिकेत कोण असणार, याबाबत आतापासूनच चर्चा रंगू लागल्या आहेत.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement