SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग : वीज कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, ऊर्जामंत्र्यांसोबतच्या बैठकीत नेमकं काय झालं..?

राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे… विविध मागण्यांसाठी संपावर गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांनी अखेर आपले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरण कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागात अंधार पसरला होता. मात्र, आता संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे..

वीज वितरणच्या खासगीकरणास विरोध करतानाच, विविध मागण्यांसाठी महावितरण कर्मचारी संपावर गेले होते. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासोबत वीज कर्मचाऱ्यांची आजची बैठक अचानक रद्द झाल्याची बातमी समोर आली. त्यामुळे हा संप चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती.

Advertisement

बैठकीत काय ठरलं..?
अखेर आज उशिरा ऊर्जामंत्री राऊत यांची वीज कर्मचाऱ्यांसोबत बैठक झाली.. त्यात कोणत्याही परिस्थितीत वीज वितरणचे खासगीकरण होऊ देणार नसल्याचे आश्वासन ऊर्जामंत्री राऊत यांनी कर्मचाऱ्यांना दिले. ऊर्जामंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर वीज वितरण कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली..

दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबतचा एकतर्फी निर्णय मागे घेण्याचीही मागणी वीज कर्मचाऱ्यांनी केली. त्यावर ऊर्जामंत्री राऊत यांनी तातडीने सूचना देऊन हा निर्णय बदलण्याचे आश्वासन दिले. वीज कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय बदली धोरण राबवलं जाणार नसल्याचंही ते म्हणाले.

Advertisement

वीज वितरणच्या खासगीकरणाचा घाट केंद्र सरकारने घातल्याचा आरोप वीज कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्याविरोधात हे कर्मचारी संपावर गेले होते. मात्र, खासगीकरणाच्या धोरणाला महाराष्ट्र सरकारचाही विरोध असल्याचे सांगण्यात आले. 2003 च्या सुधारित बिलाविरोधात वीज कर्मचारी आक्रमक झाले होते. वीज वितरणच्या खासगीकरणाला विरोध असेल, असे कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

जाहिरातीच्या माध्यमातून महावितरणमध्ये नोकर भरती केली होते. तसाच निर्णय कंत्राटी कामगारांबाबत व्हावा. कंत्राटी कामगारांनाही सुरक्षा देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली. त्यावरही आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली..

Advertisement

राज्य अंधारात जाण्यापासून वाचले..
दरम्यान, वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यात अनेक ठिकाणी अंधार पसरला होता. संप लवकर न मिटल्यास सारा महाराष्ट्रच अंधारात जाण्याची भीती व्यक्त होत होती. अनेक सरकारी कार्यालयांचे काम ठप्प झाले होते. विजेअभावी शेतकऱ्यांनाही पिकांना पाणी देता येत नव्हते. उद्योग-धंदेही बंद पडले होते. अखेर संपावर तोडगा निघाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement