SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता महिन्याला मिळणार ‘एवढी’ पेन्शन, एलआयसीच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करण्यासाठी वाचा..

एकीकडे कोरोना महामारीमुळे लाखो-करोडो लोक बेरोजगार झाले आहेत, तर दुसरीकडे सरकारने काही विभागातील पेन्शन रद्द केल्याचं आपण ऐकलं असेल. निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन संपल्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. पण जेव्हा भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) तुमच्या पाठीशी असेल, तेव्हा घाबरायचे काय? होय, कारण LIC Saral Pension Yojana (एलआयसी सरल पेन्शन योजना) नावाने एक उत्तम योजना सुरू केली. ज्यात तुम्हाला निवृत्तिनंन्तर पेन्शन मिळते.

समजा तुम्ही नोकरी करत असाल तर निवृत्तीनंतर तुमच्याकडे किती पैसे असतील आणि ते किती वर्ष पुरतील याचा काही नेम नसतो. प्रत्येक जण नोकरी करत असताना कुठे ना कुठे काहीतरी गुंतवणूक करत असतो. कोणी निवृत्तीसाठी थोडीफार गुंतवणूक करू लागतो. तुम्हालाही निवृत्तीनंतर आरामात दिवस काढायचे असतील तर एक खास असा पर्याय एलआयसी ने उपलब्ध करून दिलाय.

Advertisement

जाणून घेऊ योजनेचे फायदे..

तुम्ही एलआयसीच्या जीवन सरल पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला वयाच्या 60 नंतर फिक्स पेन्शन मिळते. तुम्ही पेन्शन योजना घेण्याचा विचार करत असाल, तर भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) ची सरल पेन्शन योजना निवडू शकता. ज्यामध्ये तुम्ही फक्त एकदाच प्रीमियम भरून आयुष्यभर पेन्शन घेऊ शकता. सरल पेन्शन योजनेत तुम्हाला किती पेन्शन मिळेल, ते तुम्ही पैसे कसे गुंतवता, यावर अवलंबून असते. एलआयसी सरल पेन्शन योजनेमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला निवृत्तीनंतर 12 हजार रुपये पेन्शन मिळण्याची सुविधा सुरु होते. एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेत तुम्हाला दर महिन्याला, तीन महिन्याला, सहा महिन्याला किंवा वर्षभरात सर्व पेन्शन एकदाच मिळण्याचे पर्याय आहेत.

Advertisement

सरल पेन्शन योजना एक Standard Immediate Annuity वार्षिकी योजना आहे. कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ दोन प्रकारे घेऊ शकते. पहिल्या पर्यायामध्ये, तुम्ही तुमच्या जोडीदाराला (पती किंवा पत्नी) तुमच्यासोबत समाविष्ट करू शकता. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या जोडीदाराला पेन्शनची सुविधा मिळत राहते.

दुसऱ्या पर्यायामध्ये, तुम्ही एक ठराविक एकरकमी रक्कम जमा करून पेन्शनचा लाभ घेऊ शकता. यामध्ये पॉलिसीधारकाच्या जोडीदाराला देखील कव्हरेज मिळते. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर जोडीदाराला पेन्शन मिळते आणि या दोघांनंतर नॉमिनीला तुमचे जमा केलेले पैसे मिळतील. जर तुम्ही दरमहा पेन्शन मिळवण्याचा पर्याय निवडला तर तुम्हाला दरमहा 1000 रुपये मिळतील. तीन महिन्यांसाठी 3,000 रुपये, 6 महिन्यांसाठी 6,000 रुपये आणि एका वर्षासाठी 12,000 रुपये पेन्शन मिळत राहते.

Advertisement

दरम्यान, एलआयसीच्या जीवन सरल पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्यासाठी वयाची अट आहे. यामध्ये वय 40 ते 80 वर्षांच्या दरम्यान तुमचे वय असावे लागते. पॉलिसी खरेदी केल्यानंतर तुम्हाला ती आवडली नाही आणि तुम्ही तिचा लाभ घेऊ इच्छित नसल्यास तुम्ही ती खरेदी केल्यानंतर 6 महिन्यांनंतर कॅन्सल अथवा सरेंडर करू शकता. तसेच पॉलिसी सरेंडर केली की तुम्ही जी रक्कम गुंतवली असेल त्यापैकी तुम्हाला एकूण जमा केलेल्या रकमेपैकी 95 टक्के परत मिळेल. ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी तुम्ही तुमच्या घराजवळील शाखेत ही पॉलिसी घेऊ शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement