SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘परीक्षा पे चर्चा’.. पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 एप्रिलला साधणार विद्यार्थ्यांशी संवाद..!

परीक्षेच्या काळातील तणाव कसा हाताळावा, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी येत्या 1 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील विद्यार्थी, शिक्षक व पालकांसोबत संवाद साधणार आहेत.

राजभवनात ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम होणार असून, त्यासाठी वेगवेगळ्या राज्यांमधील राजभवनात निवडक पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्याची आल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे देण्यात आली.

Advertisement

2018 पासून ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम होतो. यंदा या कार्यक्रमाचे पाचवे वर्ष आहे. पंतप्रधान मोदी 1 एप्रिल रोजी ताल्कातोरा स्टेडियममधून डिजिटल पद्धतीने विद्यार्थ्यांना संबोधित करणार असल्याची माहिती केंद्रिय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.

राज्यपालांसोबत कार्यक्रम पाहण्याची संधी
संबंधित राज्यांतील राज्यपालांसोबत त्या त्या राज्यांच्या राजभवनांमध्ये मोजक्या विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम पाहता येणार असल्याचे शिक्षणमंत्री प्रधान यांनी सांगितले.

Advertisement

हा कार्यक्रम केंद्र सरकारकडून निधी दिल्या जाणाऱ्या संस्थांमध्ये, वैद्यकीय आणि नर्सिंग महाविद्यालयांमध्ये, मनुष्यबळ आणि विकास मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या संस्थांमध्ये तसेच इतर संस्थांमध्ये लाइव्ह दाखवला जाणार आहे.

यासंदर्भात सर्व मुख्यमंत्री व राज्यपालांना पत्र लिहिणार आहेत. मागील ‘परीक्षा पे चर्चा’च्या कार्यक्रमांना सर्वच राज्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. तसाच प्रतिसाद यंदाही मिळावा, अशी अपेक्षा शिक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement