SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दहावी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी, भारतीय लष्करात विविध पदांसाठी भरती..

भारतीय सैन्य दलांत नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे.. भारतीय लष्कराच्या (Indian Army) जबलपूर येथील ‘ग्रेनेडियर्स रेजिमेंटल सेंटर’मध्ये विविध पदांसाठी भरती होत आहे. त्यासाठी दहावी उत्तीर्ण तरुणांकडून अर्ज मागवले आहेत. या भरतीबाबतची (Indian Army Recruitment 2022) अधिकृत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे.

‘या’ पदांसाठी होणार भरती

Advertisement
  • कूक
  • टेलर
  • रेन्ज चौकीदार
  • न्हावी
  • सफाई कर्मचारी

शैक्षणिक पात्रता

कूक – उमेदवारांनी संबंधित विषयासह कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.

Advertisement

टेलर – मान्यताप्राप्त बोर्डातून 10 परीक्षा उत्तीर्ण, मान्यताप्राप्त ‘आयटीआय’ संस्थेतून टेलर ट्रेडचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

रेन्ज चौकीदार – मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण, या कामाचा किमान एका वर्षाचा अनुभव असावा.
न्हावी – मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण. न्हावी म्हणून एक वर्ष व्यवसाय वा नोकरीचा अनुभव असणं आवश्यक.
सफाई कामगार – मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण, एक वर्षाचा अनुभव बंधनकारक

Advertisement

पगार

  • कूक – 19,900 ( लेव्हल-2)
  • टेलर – 18,000 (लेव्हल-1)
  • रेन्ज चौकीदार – 18,000 (लेव्हल -1)
  • न्हावी – 18,000 (लेव्हल -1)
  • सफाई कर्मचारी – 18,000 (लेव्हल -1)

आवश्यक वयोमर्यादा

Advertisement

पात्र उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षांदरम्यान असावं. इतर मागासवर्गीय उमेदवारांना वयात 3 वर्षांची, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील उमेदवारांना 5 वर्षांची सवलत देण्यात येईल.

निवड प्रक्रिया

Advertisement

पात्र अर्जदारांची निवड लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षेत जनरल इंटिलिजन्स, रिझनिंग, जनरल अवेअरनेस, इंग्रजी भाषा आणि कॉम्प्रिहेन्शन विषयांवरील प्रश्न असतील. परीक्षा पास झालेल्या उमेदवारांना कौशल्य चाचणीसाठी बोलवले जाईल.

अर्ज प्रक्रिया सुरु झालेली तारीख : 28 मार्च 2022

Advertisement

अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 1 मे 2022

असा करा अर्ज
– उमेदवारांना indianarmy.nic.in या संकेतस्थळावरुन फॉर्म डाउनलोड करावा लागेल.
– अर्ज पूर्णपणे भरुन संबंधित कागदपत्रं आणि तपशील शेवटच्या तारखेपूर्वी ‘कमांडंट, ग्रेनेडियर्स रेजिमेंटल सेंटर, जबलपूर (एम.पी.) पिन – 482001′ या पत्त्यावर सीलबंद कव्हरमध्ये पाठवावा.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement