SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘आयपीएल’मधून माघार घेणाऱ्या खेळाडूंना दणका, ‘बीसीसीआय’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

इंडियन प्रीमियर लिग.. अर्थात ‘आयपीएल’च्या 15 व्या पर्वास शानदार सुरुवात झालीय.. सुरुवातीच्या सामन्यांमध्येच थरारक लढती पाहायला मिळाल्या.. त्यामुळे आगामी दोन महिने क्रिकेट रसिकांना जोरदार मेजवानी मिळणार हे नक्की…!

दरम्यान, ‘आयपीएल’ स्पर्धा तोंडावर आलेली असतानाच, काही विदेशी खेळाडूंनी अचानक ‘आयपीएल’मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. खेळाडूंनी ऐन वेळी माघार घेतल्याने काही फ्रँचायझींनी ‘बीसीसीआय'(BCCI)कडे याबाबत चिंता व्यक्त केली. त्यानंतर ‘बीसीसीआय’ही आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे.

Advertisement

कोणत्याही वैध कारणाशिवाय खेळाडूंनी ‘आयपीएल’मधून बाहेर पडू नये, किंवा त्यांना स्पर्धेतून वगळले जाऊ नये, यासाठी ‘बीसीसीआय’ नवे धोरण आखत आहे. ‘आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल’च्या बैठकीत नुकतीच त्यावर चर्चा झाल्याचे समजते.

‘आयपीएल’चा महत्त्वाचा भाग म्हणजे ‘फ्रँचायझी’.. डोक्यात काहीतरी योजना आखूनच ते खेळाडूंवर पैसे लावतात. नंतर एखादा खेळाडू कोणत्या तरी कारणाने स्पर्धेबाहेर पडला, तर ‘फ्रँचायझी’च्या नियोजन धुळीला मिळते. त्यामुळे छोट्या-छोट्या कारणांवरुन ‘आयपीएल’मधून बाहेर पडणाऱ्या खेळाडूंना ‘बीसीसीआय’ दणका देणार असल्याचे समजते..

Advertisement

काय कारवाई होणार..?

  • दुखापत किंवा देशाकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची कारणे साधारणपणे न्याय्य मानली जातात. मात्र, अगदी किरकोळ कारणांवरुन ‘आयपीएल’मधून माघार घेणाऱ्या खेळाडूंना ‘वॉच लिस्ट’मध्ये टाकलं जाऊ शकतं.
  • ‘आयपीएल’मधून माघार घेणाऱ्या खेळाडूवर काही वर्षांसाठी या स्पर्धेत खेळण्यास बंदी घातली जाऊ शकते. अर्थात, हा निर्णय प्रत्येक प्रकरणासाठी वेगळा असेल. ही कारवाई करण्यापूर्वी कारणाबाबत संशोधन केले जाईल.

कमी रक्कम मिळाल्याने माघार
इंग्लंडचे जेसन रॉय व अ‍ॅलेक्स हेल्स यांनीही यंदाच्या ‘आयपीएल’मधून अचानक माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी ‘बायो बबल फटींग’चं कारण दिलं होतं. विशेष म्हणजे, ‘मेगा ऑक्शन’पूर्वीच या दोघांनाही ‘आयपीएल’चं वेळापत्रक नि ‘बायोबबल’बाबत संपूर्ण माहिती होती, पण लिलाव झाल्यानंतर त्यांनी स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

यादरम्यान अशी चर्चा होती, की लिलावात कमी रक्कम मिळालेल्या खेळाडूंचा स्पर्धेतून बाहेर पडण्याकडे कल असतो. जेसन रॉय व अ‍ॅलेक्स हेल्स यांना ‘मेगा ऑक्शन’मध्ये त्यांच्या ‘बेस प्राईस’मध्येच (आधारभूत किमतीतच) खरेदी करण्यात आले होते. याच कारणामुळे या दोघांनी ‘आयपीएल-2022’ सोडण्याचा निर्णय घेतला.. आता ‘बीसीसीआय’ काय कारवाई करतेय, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement