SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): कामात स्थिरता ठेवावी. धार्मिक वृत्तीत वाढ संभवते. इतरांना आनंदाने मदत कराल. पित्तविकार बळावू शकतात. इतरांच्या विश्वासास पात्र व्हाल. खूप काम, मानसन्मान आणि आर्थिक लाभ मिळणार म्हणून असा हा दिवस खूप आनंदात जाईल. मौजमजेसाठी बाहेर जाणं होईल. दिवस शुभ. आज तुम्ही स्वतःवर आनंदी असाल. विरोधकांच्या टीकेकडे लक्ष न देता आपले काम करा.

वृषभ (Taurus): खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. फार अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. तुमचे धाडस वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे. मित्र तुम्हाला जास्त मानसिक ताण देईल. शुक्र आर्थिक लाभ करून देईल. स्वतःवर खर्च कराल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. दिवस चांगला आहे. लोकवाद टाळण्याचा प्रयत्न करा. प्रतिकूल परिस्थिती उद्भवल्यावर रागावर नियंत्रण ठेवा.

मिथुन (Gemini) : मनातून निराशा दूर सारावी. अडथळ्यातून मार्ग काढावा. खर्चाचे योग्य नियोजन करावे. मुलांचा आनंद द्विगुणित होईल. उधारीचे व्यवहार सावधानतेने करावेत. राशीच्या व्यय स्थानात चंद्र राहू आर्थिक आणि मानसिक ताण निर्माण करेल. काही तरी कुरबुर होईल. प्रकृती जपा. दिवस मध्यम. विनाकारण चिंतेने मन व्याकुळ होईल. कठोर परिश्रमाने नवीन यश मिळेल. सामाजिक जबाबदारीही वाढेल.

कर्क (Cancer) : दिवस मनाजोगा घालवाल. काही गोष्टी जाणीवपूर्वक लपवाल. तुमची उत्तम छाप पडेल. जि‍भेवर साखर ठेवून बोलाल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. आज दिवस मित्रमैत्रिणीसोबत घालवा. संततीला वेळ द्या. त्यांचे प्रश्न सोडवावे लागतील. आर्थिक लाभ होतील. दिवस उत्तम आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात खूप घडामोडी होतील. आज कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी व्यवहार करू नका.

Advertisementसिंह (Leo) : आवडत्या लोकांच्यात रमून जाल. बोलण्यात मधाळपणा जपाल. कामाच्या ठिकाणी संबंध जपाल. सामाजिक कामात पुढाकार घ्याल. इतरांवर आपली उत्तम छाप पाडाल. तुम्ही केंद्र स्थानी असाल. संततीची काही चिंता असेल तर ती आता दूर होईल. आज दिवस भाग्य घेऊन येईल. मात्र थोडी हुरहूर मनात राहिल. कामाचा ताण वाढेल. संध्याकाळच्या वेळी अचानक मुलाकडून चांगली बातमी मिळू शकते.

कन्या (Virgo) : शेअर्स मधून लाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी समाधानी राहाल. कौटुंबिक बाबीत दुर्लक्ष करू नका. तुमचे नाव होणार आहे. घराकडे लक्ष असू द्या. दिवस चांगला आहे. आज दिवस भाग्य घेऊन येईल. मात्र थोडी हुरहूर मनात राहिल. कामाचा ताण वाढेल. पण तुमचे नाव होणार आहे. घराकडे लक्ष असू द्या. दिवस चांगला आहे.आज दिवस मानसिक ताणतणाव, शारीरिक कष्ट यांनी तुम्हाला त्रस्त करेल.

तुळ (Libra) : मैत्रीत कटुता येणार नाही याची काळजी घ्यावी. उगाच चिडचिड करू नका. आपली संगत एकवार तपासून पाहावी. जवळचा प्रवास मजेत कराल. कौटुंबिक जिव्हाळा वाढेल. राहू काही विचित्र अनुभव देईल. दिवस मध्यम. आज घरगुती प्रश्नांचा सामना करावा लागेल. वैवाहिक जीवन थोडे तणावपूर्ण होईल. प्रकृतीची काळजी घ्या. फार कष्ट करू नका. दिवस मध्यम. सर्जनशील कार्याचा आनंद घ्याल.

वृश्‍चिक (Scorpio) : मानसिक चंचलता जाणवेल. मैत्रीचे संबंध घट्ट होतील. कामात स्त्रियांची मदत मिळेल. वागण्यात शालीनता दाखवाल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल. घरात काही गोष्टी चर्चा निर्माण करतील. आर्थिक देणंघेणं करू नका. नातेवाईक नाराज होण्याचे संकेत आहेत. दिवस मध्यम. आजचा दिवस हा घर आणि संतती यांना वेळ देण्याचा आहे. शैक्षणिक बाजू ठिक राहिल. गृहस्थांचे प्रश्न सुटतील. राज्याची मदतही मिळेल.

Advertisementधनु (Sagittarius) : काही कामे कमी श्रमात पार पडतील. अचानक धनलाभ संभवतो. रेस, सोडत यातून लाभ संभवतो. बौद्धिक ताण राहील. आपलेच म्हणणे खरे कराल. तुम्ही सरकारी नोकर असाल तर तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्याचा राग काढावा लागेल. संध्याकाळच्या वेळी समाजबांधव फायदेशीर ठरतील. नवीन योजनेकडे लक्ष द्या, अचानक लाभ होऊ शकतो. वैवाहिक सौख्यात वाढ लोकांशी संबंध अधिक दृढ होतील.

मकर (Capricorn) : कलासक्त दृष्टीकोन वाढीस लागेल. मैत्रीचे नवीन संबंध जुळून येतील. आवडीचे पदार्थ खाल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. आनंदी दृष्टीकोन बाळगाल. मतभेद हानीकारक ठरतील. रागावर नियंत्रण ठेवा. नवीन नात्यातून नशीब उजळेल. सामाजिक सन्मान मिळेल. तुम्ही मित्रांसोबत लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. दाम्पत्यांमध्ये सुसंवाद राहील. सूर्यास्ताच्या वेळी अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

कुंभ (Aquarious) : जोडीदाराचे प्रेमळ गुण दिसतील. भागीदारीत खुश राहाल. संपर्कातील लोकांचा जिव्हाळा वाढेल. इतरांच्या मताचा आदर करावा. हट्टीपणा दूर सारावा लागेल. घरात जास्तीची काम निघतील. दिवस चांगला. आज दिवस प्रवासी आहे. कुठेतरी जवळ फिरायला जाण्याचा बेत ठरेल. भावंडं भेटतील. काही महत्वाचे फोन येतील. दिवस शुभ आहे. अधिकार्‍यांशी चांगले संबंध निर्माण होतील. हताश विचार टाळा.

मीन (Pisces) : कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण असेल. गोड बोलून कामे साध्य करता येतील. कलागुण उत्तमरीत्या प्रकट होतील. घराची सजावट कराल. व्यवसायात समाधानकारक वातावरण राहील. काही विशेष वाचन कराल. दिवस उत्तम आहे. चतुर्थ चंद्र राहू घरात काही विशेष अनुभव देतील. आईवडील नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या. कोणत्याही सरकारी संस्थेकडून दूरगामी फायद्याची पार्श्वभूमीही आज तयार होईल.

Advertisement