SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पावसाबाबत पंजाबराव डख यांचा धक्कादायक अंदाज…! शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी..

उन्हाच्या झळा आता चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. रब्बी हंगाम अखेरच्या टप्प्यात असून, शेतमाल घरात आणण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे.. काही ठिकाणी शेतीच्या नांगरटीची कामे सुरु आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच, शेतकऱ्यांना चिंता लागलेली असते, ती पुढील पाऊसपाण्याची…!

आगामी पावसाळा कसा असेल, याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येतो. शिवाय काही हवामान तज्ज्ञही पावसाबाबतचा अंदाज सांगत असतात. त्यापैकीच एक महत्वाचे नाव म्हणजे, हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख.. आतापर्यंत डख यांनी वर्तवलेले हवामानाचे अनेक अंदाज अचूक ठरले आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे.

Advertisement

कसे असेल पाऊसपाणी..?
पंजाबराव डख यांनी नुकताच आगामी हंगामातील पावसाबाबत अंदाज वर्तवला.. अकोल्यातील तेल्हारा येथे तालुका कृषी व्यावसायिक संघातर्फेआयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, की यंदाच्या हंगामात राज्यात जोरदार पाऊस होणार आहे. शेतकऱ्यांनी अजिबात पावसाची चिंता करु नये. आतापासूनच पिकांचे गणित मांडावे, असा सल्ला डख यांनी दिला.

ऐन पेरणीच्या काळात पाऊस झाल्यास पेरणी लांबली जाते. त्यामुळे पेरणीपूर्व, म्हणजेच 15 ते 30 मे या काळात झालेला पाऊस पेरणीयोग्य मानला जातो. किमान 100 मिमी पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवावी. योग्य पाऊस झाल्यावर पेरा केला, तरच पीक चांगले येते नि शेतकऱ्यांच्या पदरात माप पडते, असे ते म्हणाले.

Advertisement

वृक्षलागवडीचे आवाहन..
गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. कधी अतिवृष्टी, तर कधी दुष्काळ, कर कधी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यासाठी झाडांचे प्रमाण वाढवणे, हाच पर्याय आहे. प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन डख यांनी केले..

पावसाळ्यात शेतीकामे करताना, विजा चमकत असल्यास झाडाखाली, विजेच्या खांबाजवळ अथवा सौरऊर्जाच्या उपकरणांजवळ उभे राहू नये. अशा ठिकाणी वीज पडण्याची शक्यता जास्त असते.अशा वेळी गवताची पेंडी पायाखाली घेऊन जमीनीच्या खोलगट भागात कानावर हात ठेवून बसावे, जेणेकरून विजेचा धोका टाळता येईल, असेही ते म्हणाले..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement