SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

केजीएफ चॅप्टर 2 चा ट्रेलर रिलीज, सिनेमा ‘या’ तारखेला थिएटरमध्ये होणार दाखल..

साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा चर्चित चित्रपट KGF: Chapter 1 च्या यशानंतर आता प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चांगलीच वाट पाहत आहेत. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता पाहून निर्मात्यांनी याआधीच या सिनेमाचे अनेक पोस्टर्स रिलीज केले आहेत. त्यामुळे ही उत्सुकता हळूहळू वाढू लागली आहे. आता प्रेक्षक या सिनेमाच्या रिलीजसाठी आतुर झाले आहेत. अशा परिस्थितीत आता चाहत्यांची प्रतीक्षा काहीशी संपली आहे, कारण KGF: Chapter 2 चित्रपटाचा ट्रेलर काल यूट्यूबवर रिलीज झाला आहे.

KGF: Chapter 2 मध्ये रॉकी भाई फेम अभिनेता यशचा दमदार अभिनय अगदी जसाच्या तसा या चित्रपटात असल्याचं समजत आहे, हे ट्रेलरमध्ये दिसून येतंय. प्रेक्षकांची मने जिंकणारा हा सिनेमा हिंदी, तेलगू, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये जगभरात रिलीज होणार आहे. या सिनेमाचा हिंदी भाषेतही ट्रेलर आपल्याला पाहायला मिळेल. हा चित्रपट रिलीज होण्यासाठी आता काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. कारण 14 एप्रिल रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Advertisement

KGF 1 प्रमाणे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात यश आणि श्रीनिधी शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यासोबतच बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडन मुख्य भूमिकेत आहे. तर आपल्या आवाजाने प्रभावित करणारा अभिनेता संजय दत्त अधिरा नावाच्या खतरनाक व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे चित्रपटाची रिलीज डेट अनेकवेळा पुढे ढकलण्यात आली आहे. पण यंदा काही दिवसांनी हा सिनेमा धुमाकूळ घालण्यास आता तयार झाला आहे.

केजीएफ चॅप्टर 2 सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर पाहा:

Advertisement

स्टारकास्ट मंडळीमध्ये कोणाची फी जास्त..?

Advertisement

KGF Chapter 2 सिनेमाच्या स्टारकास्टमध्ये कन्नड स्टार यश तसेच संजय दत्त, प्रकाश राज, श्रीनिधी शेट्टी, रवीना टंडन आणि मालविका अविनाश व इतर अनेक स्टार महत्वाच्या भूमिकेत आहेत. एका अहवालानुसार, यशने KGF च्या पहिल्या भागासाठी 15 कोटी रुपये आकारले होते, तर KGF Chapter 2 साठी त्याने आपली फी 10 कोटींनी वाढवत एकूण 25 कोटी रुपये फी घेतली आहे.

KGF Chapter 2 मध्ये यशशिवाय संजू बाबा म्हणजेच संजय दत्तने जबरदस्त खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी अधीराच्या भूमिकेसाठी तब्बल 9 कोटी रुपये फी घेतल्याचं समजतंय. दुसरीकडे, अभिनेत्री श्रीनिधी शेट्टीबद्दल बोलायचे झाले तर, चाहते तिला या भागातही पाहण्यासाठी उत्सुक आहेत. श्रीनिधीने या चित्रपटासाठी 3 कोटी रुपये घेतले आहेत. तर बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने या चित्रपटासाठी दीड कोटी फी घेतल्याची माहिती आहे. आताही चित्रपट लवकरच कोट्यवधी रुपये कमावणार असल्याची खात्री त्याची लोकप्रियता पाहून होत आहे..
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement