SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खुशखबर! आता आयपीएल पाहा मोफत, वापरा ‘ही’ खास आयडिया..

भारतात क्रिकेटप्रेमी हे अनेक सामन्यांना स्टेडियमममध्ये उपस्थित राहून आपली हौस पूर्ण करतात तर काही घरबसल्या क्रिकेट सामन्यांचा आनंद घेतात. क्रिकेट चाहत्यांसाठी विविध टीव्ही चॅनेल्स क्रिकेटचे लाईव्ह प्रक्षेपण करत असतात. पण सध्याच्या काळात तुम्हाला तुमच्या मोबाईलवरही क्रिकेट सामने पाहता येतात. TATA IPL ही 26 मार्चपासून सुरु झाली आहे. सध्या हे सामने Disney + Hotstar वर लाईव्ह दाखवले जातात. ही आयपीएल आता तुमच्या मोबाईलवर तुम्ही पाहू शकता, पण यासाठी तुम्हाला माहीत हवं की कोणता रिचार्ज तुम्हाला परवडू शकतो मग चला जाणून घेऊया..

IPL 2022 ची सुरुवात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यातील पहिल्या सामन्याने झाली. असे अनेक सामने तुम्हाला पाहण्यासाठी जिओ, एअरटेल आणि वोडाफोनने क्रिकेट चाहत्यांसाठी काही रिचार्ज प्लॅन्स आणले आहेत. त्याने तुम्ही मोबाईलवर आयपीएल पाहू शकता. या प्लॅनमध्ये Disney प्लस Hotstar सबस्क्रिप्शनसोबतच तुम्हाला अमर्यादित डेटा, मोफत कॉलिंग, एसएमएस आणि इतर लाभ दिले जातील.

Advertisement

जाणून घेऊ खास रिचार्ज प्लॅन्सबद्दल..

एअरटेल यूजर्ससाठी प्लॅन

Advertisement

देशातील अजून एक टॉपची टेलिकॉम कंपनी एअरटेल 499 रुपयांचा रिचार्ज प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह Disney प्लस Hotstar सदस्यत्व देते. त्यामध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा, 100SMS, अनलिमिटेड कॉलिंग मिळते.आहे. यासोबतच विविध सिनेमे, वेबसीरीज पाहण्यासाठी तुम्हाला Airtel Amazon Prime Video ची 30 दिवसांसाठी मोफत ट्रायल (Mobile Edition Free Trial) मिळते. तसेच 3 महिन्यांसाठी Apollo 24|7 Circle, Shaw Academy Free online courses, FASTag आणि Wink Music वर म्युझिक, हॅलोट्यून्स, लाईव्ह कॉन्सर्ट्स & पॉडकास्टचा लाभ मिळेल.

जिओ यूजर्ससाठी प्लॅन

Advertisement

आपल्याला IPL चे सामने मोफत पाहायचे असतील तर Jio चा 499 रुपयांचा रिचार्ज प्लॅन तुम्ही टाकू शकता. यामध्ये अनेक फायदे मिळतात जे अन्य रिचार्ज प्लॅन्समध्येही येतात. तुम्ही Disney प्लस हॉटस्टार चे सदस्यत्व घेऊन आयपीएल मोफत पाहू शकता. Disney प्लस Hotstar सदस्यत्व असलेल्या मोबाईल वापरकर्त्यांसाठी हा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे. क्रिकेट पॅकसह, वापरकर्त्यांना 28 दिवसांसाठी दररोज 2GB अमर्यादित डेटा, मोफत कॉलिंग, दररोज 100SMS, Jio TV, Jio Cinema, Jio Mart च्या वस्तूंवर 20 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट असे फायदे मिळतील. Disney + Hotstar सोबत Jio वापरकर्त्यांना चार प्लॅन मिळतात जे दररोज 2GB डेटा देतात.

व्होडाफोन-आयडीया यूजर्ससाठी प्लॅन

Advertisement

भारतातील आणखी एक मोठी कंपनी Vodafone Idea म्हणजेच Vi ने देखील 499 रुपयांचा रिहारज प्लॅन सादर केला आहे. 499 रुपयांच्या रिचार्जवर, तुम्हाला Disney + Hotstar सब्स्क्रिप्शन 1 वर्षांसाठी मोफत मिळणार आहे. अनलिमिटेड कॉलिंग, फ्री 100 SMS आणि दररोज 2GB डेटा 28 दिवसांच्या वैधतेसोबत मिळेल. यामुळे तुम्हाला आयपीएलचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे. दररोजच्या 2 जीबी डेटावर तुम्ही सहजरित्या हाय क्वालिटीमध्ये आयपीएल सामने पाहू शकणार आहात. वीकेंड डेटा रोलओव्हरचा लाभही तुम्ही घेऊ शकता.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement