SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘पुष्पा’वर हैदराबाद पोलिसांची मोठी कारवाई, अल्लू अर्जुनच्या कारमध्ये सापडली बेकायदा गोष्ट..!

‘पुष्पा : दी राईज’.. या वर्षीचा पहिला ब्लाॅक बस्टर सिनेमा.. या चित्रपटाने साऱ्या देशाला वेड लावलं.. त्यातील गाण्यावर आबालवृद्धांनी ठेका धरला.. दमदार संवाद अनेकांच्या तोंडी झाले.. ‘झुकेगा नही साला..’ असं म्हणत दाढीखालून हात फिरवण्याची ‘पुष्पा’ अर्थात अल्लू अर्जुनच्या ‘स्टाईल’चे तर कित्येक दिवाने झाले..

सिनेमात जबरदस्त आवाजात विरोधकांना गार करणाऱ्या या ‘पुष्पा’वर (Pushpa) हैदराबाद पोलिसांसमोर मात्र झुकण्याची वेळ आली. एवढंच नव्हे, तर मोठा दंड भरुन त्याला स्वत:ची सुटका करुन घ्यावी लागली.. या दाक्षिणात्य ‘सुपरस्टार’वर कशामुळे ही वेळ आली, नेमकं असं काय झालं होतं, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

नेमक काय झालं..?

हैदराबाद ट्रॅफिक पोलिसांनी शनिवारी (ता. 26) शहरात बेकायदा वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईसाठी विशेष मोहीम राबवली. त्यात एमएलए (MLA) स्टिकर्स, बनावट स्टिकर्स, ब्लॅक स्टिकर्स लावलेल्या गाड्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. गाड्यांच्या काचांना लावलेले स्टिकर्स नि काळ्या फिल्म्सही वाहतूक पोलिसांनी काढून टाकल्या.

Advertisement

हैदराबाद शहरातील ‘ज्युबली हिल्स चेक पोस्ट’ येथे ही मोहीम सुरु असताना, अल्लू अर्जुनची आलिशान ‘रेंज रोव्हर’ गाडी तेथून जात होती.. वाहतूक पोलिसांनी त्याच्याही गाडीची तपासणी केली असता, त्याच्या गाडीला टिंटेड चष्म्यातील काळी फिल्म लावल्याचे आढळून आले.

वाहतूक पोलिसांनी अल्लू अर्जुनच्या कारवरील काळी फिल्म काढून टाकली. तसेच, कारला काळी फिल्म लावल्याबद्दल त्याला 700 रुपयांचा दंडही वसूल केला. दरम्यान, याच रस्त्याने दुसरा तमिळ अभिनेता कल्याण राम जात होता. त्यालाही वाहतूक पोलिसांच्या अशाच कारवाईला सामोरे जावे लागल्याचे समजते..

Advertisement

दरम्यान, ‘पुष्पा’ला मिळालेल्या जबरदस्त यशामुळे अल्लू अर्जुनच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झाली.. आता याच चित्रपटाच्या दुसऱ्या भागातून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. तसेच दुसरा अभिनेता कल्याण राम हा ‘बिंबिसारा’ या चित्रपटातून रसिकांसमोर येणार असल्याचे समजते..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement