SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गाडीचे जूने टायर कधी बदलायचे, आता लगेच कळणार..? ‘सीएट’ कंपनीचे भन्नाट तंत्रज्ञान..!

गाडीचा टायर फुटून भीषण अपघात झाल्याच्या बातम्या आपण नेहमीच वाचतो, पाहतो.. ऐकतोही.. ते पाहिल्यावर आपल्याही गाडीचा टायर जूना तर झालेला नाही ना.. अशी चिंता सतावू लागते. नेमका गाडीचा टायर कधी बदलावा, हे समजत नाही. त्यामुळे या काळजीत आणखी भर पडते..

तुम्हीही तुमच्या गाडीच्या टायरच्या चिंतेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.. खरं तर टायर फुटण्याच्या घटनेला चार मुख्य कारणे असतात. एक म्हणजे भन्नाट वेग, दुसरे म्हणजे एखाद्या टायरमधील हवेचा कमी दाब, गाडीवरील अतिरिक्त बोजा नि चौथं कारण म्हणजे टायरची झालेली झीज..

Advertisement

आता टायरची झीज झाल्याने जुना झाला की नाही, हे लगेच कळणार आहे. सीएट (CEAT) कंपनीने आता ‘कलर-ट्रेड वेअर इंडिकेटर’सह नवीन टायर्स लाँच केले आहेत. त्यामुळे वाहनमालकांना त्यांच्या गाडीचे टायर्स जुने झाल्यावर ते कधी बदलायचे, हे लगेच कळेल.. ‘कलर-ट्रेड वेअर इंडिकेटर’मुळे टायरची काळजी दूर होईल, असा दावा ‘सीएट’ने केला आहे..

‘कलर ट्रेड वेअर इंडिकेटर’बाबत..

Advertisement

सीएट कंपनीचे हे नवीन टायर्स ‘ट्रेड’च्या आत ‘एम्बेड’ केलेल्या पिवळ्या पट्ट्यासह येणार आहेत. टायर नवे असेपर्यंत ही पिवळी पट्टी दिसणार नाही, पण टायर जूने झाल्यास किंवा जीर्ण झाल्यावर ही पट्टी दिसू लागेल. त्यामुळे वाहनमालकांना आता गाडीचे टायर जूने झाल्याची माहिती मिळेल व नवे टायर्स लावण्याची हीच योग्य वेळ असल्याचे समजेल. हे टायर 15 व 16 इंच, अशा दोन आकारात उपलब्ध केले जाणार असल्याचे सांगण्यात आले..

याबाबत ‘सीएट टायर्स’चे मुख्य विपणन अधिकारी अंकुर कुमार यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की “गाड्यांचे जीर्ण झालेले टायर रस्त्यावर वापरणे, वाहनमालकांसाठी नि इतर लोकांसाठीही धोकेदायक आहे. गाडीचे टायर कधी बदलावेत, याबाबत आमच्या ग्राहकांना जागरूक करण्यासाठी टायरमध्ये ‘कलर ट्रेड वेअर इंडिकेटर’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्याचा आमच्या ग्राहकांना निश्चित उपयोग होईल…!”

Advertisement

 

Advertisement