SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अक्षय कुमार कमावलेल्या इतक्या पैशांचे करतो काय..? खुद्द अक्षयनेच केला मोठा खुलासा..!

बाॅलिवूडचा ‘खिलाडी’ म्हटलं, की एकच नाव डोळ्यासमोर येते, ते म्हणजे अक्षय कुमार.. अॅक्शन, रोमान्स वा काॅमेडी.. या खिलाडी कुमारने आपल्या दमदार अभिनयाने बाॅलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. मेहनतीच्या जोरावर आज हा अभिनेता यशोशिखरावर विराजमान झालेला आहे..

अक्षय कुमारचे दरवर्षी ओळीने चित्रपट रिलिज होत असतात. नुकताच त्याचा ‘बच्चन पांडे’ हा सिनेमा प्रदर्शित झालाय.. शिवाय जाहिरातीच्या माध्यमातून छोटा पडदाही अक्षय कुमारने व्यापला आहे. कामात सतत बिझी असणाऱ्या अशा या अक्षयला एका प्रश्नाला नेहमीच सामोरे जावे लागते, तो म्हणजे, ‘एवढं कमावून कुठे ठेवणार..?’

Advertisement

आपलं काम नि त्यातून मिळणारा पैसा, याबाबत अक्षयने नुकतंच स्पष्टीकरण दिलं. एका मुलाखतीत त्याने ही माहिती दिली. ते ऐकल्यानंतर कदाचित अक्षय कुमारच्या चाहत्यांना नि त्याच्यावर टीका करणाऱ्यांनाही अक्षय कुमारचा अभिमान वाटेल…

तीन गोष्टींना महत्व
बायोपीक, सिनेमा किंवा कोणत्याही ब्रॅंडशी केलेला करार, याबाबत बोलताना अक्षयनं आयुष्यातील तीन महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला. तो म्हणाला, की “आतापर्यंत माझ्या आयुष्यात 3 शब्द खूप महत्त्वाचे आहेत.. ते म्हणजे, काम, कमाई नि कर्म.. मी खूप मेहनत करतो. जास्तीत जास्त काम करुन पैसे कमावण्याचा माझा प्रयत्न त्यामुळेच असतो..”

Advertisement

“माझ्यासमोर आलेल्या कोणत्याही कामाचा कंटाळा करीत नाही, मग ती कोणतीही भूमिका, कार्यक्रम असो वा वस्तूची जाहिरात..! काम केलं तर पैसा मिळतो. कमावलेला पैसा सत्कारणी लागेल, माझ्याकडून एखादं चांगलं कार्य घडेल, यासाठी माझा प्रयत्न असतो. काही वर्षांपासून मी दरवर्षी जास्तीत जास्त कर भरत आहे. कमाईतील 10 टक्के रक्कम सामाजिक कार्यासाठी खर्च केलीय.”

मी असा विचार केला, की मी कमी काम करेन, सिनेमात कमी काम करेन, जाहिराती करणार नाही, तर त्याचा परिणाम माझ्या सगळ्या गोष्टींवर होईल. मी ते काही करू शकणार नाही. मी खूप साधा माणूस आहे.. मला एवढंच फक्त कळतं, की काम करा, पैसे कमवा आणि कर्म करीत राहा..” असे ते म्हणाला..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement