SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘एसबीआय’मध्ये लिपिक, पीओ पदावर नोकरीची संधी, पदवीधर तरुणांसाठी आनंदाची बातमी..

बँकिंग क्षेत्रातील नोकरीचे अनेक तरुणांचे एक स्वप्न असतं.. अशा संधीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बॅंकेत (SBI) लवकरच मोठ्या प्रमाणात नोकर भरती केली जाणार आहे.

सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करीत असलेले तरुण ‘एसबीआय’द्वारे होणाऱ्या भरतीची आतुरतेने वाट पाहत असतात. अनेक तरुण ‘एसबीआय लिपिक भरती-2022’ व ‘एसबीआय पीओ भरती-2022’च्या जाहिरातीची वाट पाहत आहेत. मात्र, आता लवकरच त्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे..

Advertisement

सर्वसाधारणपणे दरवर्षी जानेवारी ते एप्रिल दरम्यान ‘एसबीआय’द्वारे भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली जाते. त्यानुसार, आता लवकरच या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध होण्याची आशा आहे. ‘एसबीआय लिपिक भरती’साठी जून-जुलै दरम्यान प्राथमिक परीक्षा-2022 होणार असल्याचे सांगण्यात येते..

‘एसबीआय’मधील नोकर भरतीसाठी मोठ्या प्रमाणात तरुण इच्छूक असतात. या बॅंकेत भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, परीक्षेचे स्वरुप व पगार आदीबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

शैक्षणिक पात्रता

कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा पदवीच्या अंतिम वर्षात (सेमिस्टर) शिकणारे विद्यार्थी ‘एसबीआय लिपिक भरतीसाठी अर्ज करू शकतात.

Advertisement

वयाची अट

‘एसबीआय लिपिक भरती’साठी इच्छूक उमेदवारांचे वय किमान 20 वर्षे, तर कमाल वय 28 वर्षे असावे. तसेच, ‘एसबीआय पीओ भरती’साठी उमेदवारांचे किमान वय 21 वर्षे, तर कमाल वय 31 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाते.

Advertisement

परीक्षेचे स्वरुप

एसबीआय लिपिक परीक्षा

Advertisement
  • प्राथमिक परीक्षा
  • मुख्य परीक्षा
  • स्थानिक भाषा चाचणी

एसबीआय पीओ परीक्षा

  • प्राथमिक परीक्षा
  • मुख्य परीक्षा
  • मुलाखत

पगार

Advertisement

एसबीआय लिपिक पगार – बेसिक पे- 19,900/- (17,900/- + पदवीधरांसाठी दोन अ‍ॅडव्हान्स इन्क्रिमेंट).

एसबीआय पीओ पगार – निवड झालेल्या उमेदवारांना 41,960 रुपये प्रति महिना (मूलभूत वेतन) पासून सुरू होतो. प्रोबेशनरी अधिकारी/व्यवस्थापन प्रशिक्षणार्थींची वेतनश्रेणी 36,000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840 आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement