SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकरदार वर्गासाठी महत्वाची बातमी..! ‘पीएफ’ खात्याला लगेच करा ‘ई-नॉमिनेशन’, ‘असे’ होणार फायदे..!

नोकरदार वर्गासाठी एक महत्वाची बातमी आहे.. कर्मचाऱ्याला दरमहा मिळणाऱ्या पगारातून काही ठराविक रक्कम भविष्य निर्वाह निधी, अर्थात ‘पीएफ’च्या (PF) स्वरुपात कापले जातात. हे पैसे कर्मचाऱ्याला त्याच्या निवृत्तीनंतर मिळतात.. मध्येच कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास ‘पीएफ’मधील ही रक्कम त्याच्या वारसाला दिली जाते..

दरम्यान, गेल्या काही दिवसांत एक बाब प्रकर्षाने समोर आलीय. ती म्हणजे, अनेक खातेदारांनी अद्याप त्यांच्या पीएफ खात्याला ‘नॉमिनी’ अर्थात वारस जोडलेला नाही. खातेदारांनी जर ‘नाॅमिनी’ जोडलेला नसेल, तर कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या ‘पीएफ’ रकमेवर कोणालाही हक्क सांगता येत नाही व ही रक्कम सरकार दरबारी जमा होऊ शकते..

Advertisement

कर्मचाऱ्यांच्या ‘पीएफ’ला ‘नाॅमिनी’ जोडण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आली आहे. अगदी घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने कर्मचाऱ्यांना पीएफ खात्याला ‘ई-नॉमिनेशन’ करता येणार आहे. अर्थात त्यासाठी 31 मार्चपर्यंतच मुदत असून, लवकरात लवकर हे काम करुन घेण्याची गरज आहे.

पीएफ खात्याला ‘ई-नॉमिनेशन’ केल्यास कर्मचाऱ्यांना 3 मोठे फायदे होणार आहेत. ते नेमके कोणते, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

‘ई-नॉमिनेशन’चे फायदे

गरजेच्या वेळी पैसे – पीएफ खात्याला ‘नॉमिनी’चे नाव जोडले नसल्यास मोठ्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. ‘नॉमिनी’ न जोडल्यास वैद्यकीय खर्च वा इतर गरजेच्या वेळी कर्मचाऱ्यालाही पैसे काढता येत नाही. ‘ई-नॉमिनेशन’ केलेले असल्यास गरजेच्या वेळी पैसे काढण्यात कोणतीही अडचण येत नाही..

Advertisement

7 लाखांपर्यंत विमा – कर्मचारी पेन्शन योजना व कर्मचारी ठेव लिंक्ड विमा योजना (EDLI) मधून पीएफ खातेधारकांना 7 लाखांपर्यंत विम्याचा लाभ मिळतो. मात्र, त्यासाठी ई-नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण झालेली असावी लागते. खातेदाराचा अपघाती मृत्यू झाल्यास, ‘नाॅमिनी’ केलेल्या व्यक्तीला ‘कर्मचारी ठेव लिंक्ड’ विमा योजनेंतर्गत विम्याची रक्कम मिळते..

असे करा ‘ई-नॉमिनेशन’..
– कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यामध्ये ई-नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ‘ईपीएफओ’ (EPFO)​ची अधिकृत वेबसाइट https://www.epfindia.gov.in/site_en/index.php वर क्लिक करा.
– येथे ‘Service’ पर्याय निवडा.
– नंतर तुमचा ‘UAN’ नंबर व पासवर्ड टाका.
– लॉगिन केल्यानंतर तुमच्या नॉमिनीचा आधार क्रमांक, नाव, जन्मतारीख आदी माहिती भरा.
– नंतर शेवटी ‘सेव्ह ईपीएफ’ नामांकन भरून तुमचे ई-नॉमिनेशन पूर्ण करा.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement