SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मुंबई महापालिकेत नोकरीची संधी, दरमहा तब्बल 72,000 रुपये पगार मिळणार..!

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई इथे काही जागांसाठी नोकर भरती होत आहे. त्यासाठीची अधिसूचना (Brihan Mumbai Mahanagarpalika MCGM Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना त्यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

मुंबई महापालिकेत कोणत्या पदांसाठी भरती होत आहे, त्यासाठी शैक्षणिक पात्रता, पगार तसेच अर्ज कसे व कुठे करायचे आहेत, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

‘या’ पदासाठी भरती – सहायक वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

Advertisement
 • इच्छूक उमेदवार एमबीबीएस (MBBS) उत्तीर्ण असावा.
 • मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलेलं असणं आवश्यक.
 • उमेदवारास संबंधित पदाचा किमान अनुभव असावा.
 • राज्य वैद्यकीय परिषदेकडे उमेदवार नोंदणीकृत असणं आवश्यक.
 • उमेदवाराने भरतीच्या सर्व अटी – शर्थी पूर्ण केलेल्या असाव्यात

पगार – 72,000/- रुपये प्रतिमहिना

अर्जासाठी शेवटची तारीख – 13 एप्रिल 2022

Advertisement

आवश्यक कागदपत्रे

 • Resume (बायोडेटा)
 • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 • पासपोर्ट साईझ फोटो

ऑनलाईन अप्लाय इथे क्लिक करा- https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous

Advertisement

सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement