SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पेट्रोल पंपावर ‘अशी’ होते तुमची फसवणूक…! पेट्रोल भरताना काय काळजी घ्याल..?

पेट्राेल-डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून रोजच वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्याचे बजेट बिघडले आहे. महागाई वाढत असली, तरी त्या प्रमाणात पगार वाढत नसल्याने सामान्य नागरिकांची चिडचिड वाढली आहे. पेट्रोलचा एक एक थेंब महाग होत असताना, पेट्रोल पंपावर फसवणूक तर होत असेल तर…

पेट्रोल पंपावर होणारे गैरप्रकार काही दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यानंतर आता त्यात सुधारणा झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी ग्राहकांनी सतर्क असणं आवश्यक आहे. तुमच्या मेहनतीचे पैसै वाया जाऊ द्यायचे नसतील, तर काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायलाच हव्यात.

Advertisement

काय काळजी घ्याल..?

‘राउंड फिगर’ रक्कम नको
बऱ्याचदा आपण पेट्रोल पंपावर गेल्यावर 100, 200 किंवा 500 ​रुपयांच्या रकमेत पेट्रोल भरण्यासाठी सांगताे. मात्र, इथेच तुम्ही मोठी चूक करता. होय.. त्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. गाडीत पेट्रोल भरताना कधीही ‘राउंड फिगर’ न सांगता, कोणताही ‘रॅन्डम’ नंबर सांगा, म्हणजेच तुम्ही 110 किंवा 220 रुपयांचे पेट्रोल घेऊ शकता.

Advertisement

डिजीटल मीटर असावं
पेट्रोल चोरीसाठी पंपावर अनेकदा मीटरमध्ये हेराफेरी केलेली असते. अनेक पेट्रोल पंप जुन्या तंत्रावर चालत असून, त्यात हेराफेरी करणं अगदी सोपं आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरा नि गाडीचं मायलेज सतत चेक करीत राहा. डिजीटल मीटर असणाऱ्या पंपावरच शक्यतो पेट्रोल भरावे.

टाकी रिकामी करु नका
गाडीची टाकी रिकामी होऊ देऊ नका. कारण, टाकी जितकी रिकामी असेल, तितकी जास्त हवा त्यात राहील. अशा स्थितीत पेट्रोल भरल्यानंतर हवेमुळे पेट्रोलचे प्रमाण कमी होते किंवा ते लवकर उठून जाते. त्यामुळे गाडीची किमान अर्धी टाकी नेहमी भरलेली ठेवावी.

Advertisement

पूर्ण पेट्रोल मिळवा
पेट्रोल पंपावरील तेल भरण्याचे पाइप लांब ठेवले जातात. पेट्रोल भरल्यावर ऑटो कट होताच कर्मचारी तात्काळ वाहनातील नोझल काढतात. अशा वेळी पाईपमधील उरलेले पेट्रोल परत जाते. त्यामुळे ऑटो कट झाल्यानंतर काही सेकंदांसाठी पेट्रोलचे नोझल टाकीमध्ये राहू द्या, जेणेकरून पूर्ण पेट्रोल मिळेल.

नोझल मोकळे हवे
पेट्रोल भरताना तेथील कर्मचाऱ्यास ‘नोजल’वरील हात काढण्यास सांगा. कारण, पेट्रोल येताना ते हळूच नोझलचे बटण दाबून ठेवतात, ज्यामुळे पेट्रोलचा स्पीड कमी होतो, ज्यामुळे पेट्रोल चोरी करणे सोपे होते.

Advertisement

मीटर रिडिंगवर लक्ष
पेट्रोल भरताना मशीनचं मीटर झिरोवर सेट आहे का, हे पाहा. आपलं लक्ष नसल्यास मीटर झिरोवर आणलं जात नाही. पेट्रोल भरताना रीडिंग कोणत्या अंकापासून सुरू झालं, हे पाहा. अनेकदा मीटरचं रीडिंग 10, 15, 20 पासून सुरू होतं. परंतु मीटर रीडिंग कमीत कमी 3 पासून स्टार्ट होणं गरजेचं आहे.

याकडेही लक्ष द्या..
पेट्रोल मीटर खूप वेगाने चालू असेल, तर समजा काहीतरी गडबड आहे. पेट्रोल पंप कर्मचार्‍यांना मीटरचा वेग सामान्य करण्याच्या सूचना द्या. कदाचित वेगवान मीटर चालवून तुमची फसवणूक होऊ शकते.

Advertisement

बहुतेक लोक जेव्हा कारमध्ये इंधन भरताना खाली उतरत नाहीत. याचा फायदा पेट्रोल पंप कर्मचारी घेतात. पेट्रोल भरताना वाहनातून खाली उतरून मीटरजवळ उभे राहा..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement