SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): काही रखडलेले प्रकल्प आता मार्गी लागतील. सोने-चांदी व्यापाऱ्यांसाठी दिवस ठीकठाक राहील. पगारदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. चार चौघात मिळून मिसळून वागाल. आवडीचे कपडे खरेदी कराल. सर्वांशी गोडीने वागाल. मनावरील ताण कमी होईल. अडचणी दूर होतील. महत्त्वाची बातमी कळेल.

वृषभ (Taurus): इच्छित ठिकाणी बदली देखील होऊ शकते. तुमच्यामध्ये भावनांचा अतिरेक असू शकतो. बाह्य उपक्रमांमध्ये जास्त वेळ घालवू नका. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. घरगुती कामात वेळ जाईल. जीवनसाथीच्या लहरीपणाचा थोडा त्रास होईल. प्रवासात दगदग होईल.

मिथुन (Gemini) : बाहेर जाताना काळजी घ्या. तुम्हाला कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठाचे बोलणे ऐकावे लागेल. उत्पन्नात वाढ होऊ शकते. तुमचा आत्मविश्वास वाढेल. स्वभाव विरोध दर्शवू नका. वाहन चालवताना काळजी घ्यावी. लहान-सहान गोष्टींनी निराश होऊ नका. क्रोधाला आवर घातला पाहिजे. आर्थिक आवक चांगली राहील.

कर्क (Cancer) : तुमच्याकडे नवीन उपक्रम असतील, ज्यामुळे तुमची सामाजिक स्थिती सुधारेल. तुमचे समाधान होईल. आर्थिक स्थितीही सुधारेल. भांडकुदळ व्यक्तींपासून दूर राहावे. कामे वेळेत पूर्ण करता येतील. उष्णतेचे त्रास संभवतात. गप्पांमधून नवीन माहिती मिळवाल. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. थोड्या कटकटी मागे राहतील.

Advertisement


सिंह (Leo) : आज तुम्ही सर्व प्रकारच्या परिस्थितींशी लढण्यासाठी स्वतःला तयार ठेवाल. नातेवाईक आणि मित्रांशी तुमचे संबंध सुधारतील. मैदानी खेळ खेळता येतील. चपळाईने कामे हाती घ्याल. आपल्यातील कौशल्य दाखवून द्यावे. मित्रांशी वाद घालणे टाळा. वाहन जपून चालवा. आज नक्कीच इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी कराल.

कन्या (Virgo) : जर तुम्ही वेळेत संधीचा पुरेपूर वापर केला तर तुमचे व्यावसायिक जीवन तुम्हाला भविष्यात खूप फायदे देऊ शकते. आरोग्याची विशेष काळजी घ्या. तुम्ही अविचाराने पैसे गुंतवू नका. बोलण्याच्या भरात जबाबदारी घ्याल. खाण्यापिण्याची पथ्ये पाळावीत. काहींना अचानक प्रवास करावा लागेल. प्रवासात काळजी घेतली पाहीजे.

तुळ (Libra) : आज तुम्ही जीवनाशी संबंधित समस्यांवर सहज मात करू शकाल. नातेवाईकांशी असलेले पूर्वीचे मतभेद मिटतील. आनंददायी परिस्थिती निर्माण होईल. परिस्थितीचा योगी आढावा घ्यावा. कानाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नये. टीकेकडे दुर्लक्ष करावे लागेल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. आज तुम्ही कायदा पाळा.

वृश्‍चिक (Scorpio) : राजकारण किंवा सामाजिक कार्याशी संबंधित लोक अनेक सभांमध्ये सहभागी होतील. तुम्हाला सन्मान मिळेल. पैसे खर्च कराल. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. खंबीरपणे निर्णय घ्यावेत. आवडीच्या गोष्टींसाठी वेळ काढाल. कामातील बदलांकडे दूर दृष्टीने पहावे. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल.

Advertisementधनु (Sagittarius) : तुम्ही सरकारी नोकरीत असाल तर नियम आणि कायद्यांचे पूर्ण पालन करा. कुटुंबातील सर्वांना सोबत घेऊन जाणे चांगले असेल. लहरीपणे वागू नये. गरज असेल तेव्हाच उदारपणे वागा. धार्मिक स्थळांना भेट द्याल. श्रम वाढण्याची शक्यता आहे. खर्चाचे योग्य नियोजन करावे लागेल. फसव्या योजनांपासून सावध राहा.

मकर (Capricorn) : समर्पित भावनेने केलेल्या परिश्रमाने वरिष्ठांना संतुष्ट करू शकता. तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो. ज्येष्ठ अधिकाऱ्याचे सहकार्य मिळेल. लहानसहान दुखण्याकडे दुर्लक्ष करू नये. आपलाच हेका पूर्ण करण्यावर भर द्याल. अडथळ्यातून मार्ग काढता येईल. फसव्या योजनांपासून सावध राहा. बदलाला सामोरे जा.

कुंभ (Aquarious) : कोणत्याही प्रकारची चर्चा करताना तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. जोडीदारासोबतचे संबंध सौहार्दाचे राहतील. उष्णतेचे विकार संभवतात. ध्येयवादी दृष्टिकोन बाळगाल. सामुदायिक वादापासून दूर राहावे. वेळेचे बंधन पाळावे लागेल. सहकारी वर्गाशी वाद होण्याची शक्यता आहे.

मीन (Pisces) : तुमचे आरोग्य चांगले राहील. नवीन जबाबदाऱ्याही अंगावर येऊ शकतात. कोणतेही कायदेशीर प्रकरण प्रलंबित असल्यास न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळण्याचे संकेत आहेत. ध्यान धारणेसाठी वेळ काढा. सामाजिक बांधीलकी जपावी. शांततेचा मार्ग स्वीकारावा. घरी पाहुणे येतील. त्यामुळे धावपळ करावी लागेल.

Advertisement