SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आयपीएलचा थरार आजपासून, ‘या’ दोन संघात रंगणार पहिला सामना..

इंडियन प्रीमियर लीगचा म्हणजेच IPL सुरू होणार आहे. आजपासून रंगणाऱ्या आयपीएलच्या रणसंग्रामात पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपरकिंग्स (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या दोन संघांत पार पडणार आहे. क्रिकेटच्या चाहत्यांसाठी ही गेल्या काही महिन्यांनंतर चांगली भेट असणार आहे.

कोरोनाविषयक सर्व नियमांचं पालन करून यंदा आयपीएलचे सर्व सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या ठिकाणी खेळवले जाणार आहेत. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन नव्या संघांचा TATA IPL Season 15 मध्ये समावेश झाला आहे. यामुळे यंदा सामन्यांची संख्या 60 वरून 74 झाली आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

💰 आयपीएल पाहता पाहता इंडियन टी-20 लीग खेळा आणि करोडो कमवा..!💁‍♂️ आजच MYTEAM11 वर रजिस्टर करण्यासाठी लगेच क्लिक करा 👉 https://bit.ly/3tCBoCv

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

चेन्नई सुपर किंग्स ची धुरा महेंद्रसिंग धोनीने रवींद्र जडेजावर सोपवली आहे. या अष्टपैलू खेळाडूने अनेक सीझन गाजवले आहेत. आता चेन्नईला कोणत्या उंचीवर नेऊन ठेवेल, हे पाहणं विशेष असणार आहे. याचसोबत कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन श्रेयस अय्यर आहे. ज्याने अलीकडेच झालेल्या श्रीलंकेविरुद्ध प्रभावी फलंदाजी करून फॅन्सचं मन जिंकलं आहे. असाच फॉर्म आता आयपीलमध्ये राहून तडाखेबाज खेळीची अपेक्षा त्याच्याकडून व टीममकडून व्यक्त होत आहे.

Advertisement

CSK vs KKR हा आजचा पहिला सामना सायंकाळी ठीक 7.30 वा. स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 2, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या) यांवर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. याशिवाय तुमच्याकडे Disney+ Hoststar चं सबस्क्रिप्शन असल्यास तुम्ही तुमच्या स्मार्टफोन वर देखील आयपीएल पाहू शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

हि बातमी देखील नक्की वाचा

‘आयपीएल’ आता अधिक रोमांचक होणार, ‘डीआरएस’ ते ‘सुपर ओव्हर’पर्यंतच्या नियमांत होणार मोठे बदल…!

Advertisement