SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘ड्रायव्हिंग लायसन्स’, ‘आरसी’ सोबत बाळगण्याची गरज नाही, फक्त ‘हे’ काम करावे लागणार..!

‘ड्रायव्हिंग लायसन्स’.. अर्थात वाहन चालविण्याचा अधिकृत परवाना.. हे एक असं सरकारी कागदपत्रं आहे, जे तुम्हाला देशात कुठेही वाहन चालवण्याची परवानगी देते. ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ नसताना, वाहन चालविताना आढळून आल्यास वाहतूक पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाते.

‘ड्रायव्हिंग लायसन्स’ किंवा गाडीचे ‘आरसी’ (रजिस्ट्रेशन कार्ड) जवळ न ठेवल्याबद्दल आतापर्यंत अनेकदा तुम्हाला कारवाईला सामोरे जावे लागले असेल. पोलिसांकडून तुमचे चलन कापले गेले असेल. कारण, ही महत्वाची कागदपत्रे ड्रायव्हरकडे असणं अत्यंत गरजेचं होतं. मात्र, आता तशी कारवाई करता येणार नाही..

Advertisement

मोदी सरकारने नुकतीच मोटार वाहन कायदा-1989 मध्ये दुरुस्ती केली. त्याच्या आधारे केंद्र सरकारने अधिसूचना काढली असून, त्यानुसार आता गाडी चालवताना ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ किंवा ‘आरसी’ (RC) बूक सोबत बाळगण्याची काहीही गरज नाही. ही कागदपत्रे नसली, तरी वाहतूक पोलिसांना तुमच्यावर कारवाई करता येणार नाही.

प्रत्यक्ष ही कागदपत्रे सोबत बाळगण्याऐवजी, तुम्ही ही कागदपत्रे ‘एम परिवहन’ या मोबाईल अ‍ॅपमध्ये (mParivahan mobile app) साठवून ठेवू शकता. वाहतूक पोलिसांनी अडवल्यास अ‍ॅपवरील कागदपत्रे तुम्हाला पोलिसांना दाखवता येतील.. वापरकर्त्यांसाठी हे 100 टक्के स्वीकार्य, प्रमाणित आणि सोयीस्कर करण्यात आले आहे.

Advertisement

कागदपत्रे अ‍ॅपवर कसे ठेवणार..?
सर्वप्रथम ‘गुगल प्ले स्टोअर’ (Google Play Store) वरून ‘एम.परिवहन’ अ‍ॅप डाऊनलोड करा.
– तुमच्या मोबाइल नंबरच्या साहाय्याने ‘साइन इन’ करा. मोबाईलवर आलेला ‘ओटीपी’ टाकून नोंदणी करा.
– आता तुमच्याकडे दोन पर्याय आहेत – ड्रायव्हिंग लायसन्स व आरसी (नोंदणी प्रमाणपत्र).
– तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर प्रविष्ट करा.
– व्हर्च्युअल ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ जनरेट करण्यासाठी ‘Add to My Dashboard’ वर क्लिक करा.
– जन्मतारीख प्रविष्ट केल्यानंवर तुमचे ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ डॅशबोर्डमध्ये जोडला जाईल.

अ‍ॅपचा वापर कसा करणार..?
‘एम.परिवहन’ अ‍ॅपवर ‘व्हर्च्युअल ड्रायव्हिंग लायसन्स’ पाहण्यासाठी ‘डॅशबोर्ड’वर क्लिक करा. तुमच्यासमोर लायसन्स व क्यूआर कोडची संपूर्ण माहिती दिसेल. त्याचा वापर अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची सर्व आवश्यक माहिती स्कॅन करण्यासाठी केला जातो. अ‍ॅपवर वाहनांच्या ‘आरसी’ बुकचीही माहिती जोडता येते.

Advertisement

किती वाहने जाेडणार..?
एखादी व्यक्ती ‘एम परिवहन’ अ‍ॅपवर कितीही वाहनांची माहिती ठेवू शकते. समजा पत्नीच्या नावे नोंदणी असलेले वाहनाची माहिती पतीला या अ‍ॅपमध्ये जोडू शकतो. अनेक मोबाइलमध्येही या अ‍ॅपवर ‘ड्रायव्हिंग लायसन्स’चा तपशील ठेवता येतो.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement