‘आयपीएल’च्या 15 व्या पर्वास आजपासून (ता. 26) सुरुवात होत आहे. चेन्नई सुपर किंग्ज व कोलकाता नाइट राइडर्समध्ये आजचा पहिला सामना होणार आहे. पुढील दोन महिने क्रिकेटचा हा कुंभमेळा रंगणार असल्याने क्रिकेट चाहत्यांसाठी अनोखी मेजवानीच मिळणार आहे..
‘स्टार स्पोर्ट्स चॅनेल्स’सह ‘डिस्ने प्लस हाॅटस्टार’वर क्रिकेटचा हा थरार अनुभवता येणार आहे.. अनेकांना कामामुळे घरी बसून ‘आयपीएल’चा आनंद लूटता येत नाही. अशा क्रिकेट रसिकांना ‘स्मार्टफोन’वर कुठेही बसून हे सामने पाहता येणार आहेत.
‘आयपीएल’मधील (IPL-2022) सगळ्या मॅचेस् ‘डिस्ने + हाॅटस्टार’सह (Disney+ Hotstar) ‘जिओ टीव्ही’ अॅपवर (JioTV App) क्रिकेट रसिकांना लाइव्ह पाहता येणार आहेत. त्यासाठी ‘जिओ’कडून (Jio) अगदी स्वस्तात मस्त ‘रिचार्ज प्लॅन’ सादर करण्यात आला आहे, ज्यावर ग्राहकांना ‘डिस्ने + हाॅटस्टार’चा अॅक्सेस मिळणार आहे.
ग्राहकांसाठी ‘रिलायन्स जिओ’चे वेगवेगळे ‘रिचार्ज प्लॅन्स’ उपलब्ध असून, त्यामुळे ग्राहकांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळ्या अॅपचे सबस्क्रिप्शन मिळते. ‘आयपीएल’ सामन्यांची मजा लुटण्यासाठी क्रिकेट रसिकांसाठी ‘जिओ’ने अगदी स्वस्तात रिचार्ज प्लॅन आणला आहे. ज्यावर नागरिकांना ‘डिस्ने + हाॅटस्टार’चे सब्सक्रिप्शनही मिळणार आहे. या प्लॅनबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
जिओचा 499 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
– ‘जिओ’च्या 499 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना ‘डिस्ने + हाॅटस्टार’चे एक वर्षाचं सब्सक्रिप्शन मिळतं. त्यामुळे ग्राहकांना ‘आयपीएल’बरोबरच वर्षभर हाॅटस्टारवरील इतरही कार्यक्रम पाहता येणार आहेत.
– या रिचार्ज प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.
– ग्राहकांना रोज 2GB डेटा ऑफर केला जातो, म्हणजेच 28 दिवसांसाठी एकूण 56GB डेटा मिळतो.
– शिवाय ग्राहकांना रोजा 100 मेसेज, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधाही मिळते.
– ‘जिओ’च्या प्रीपेड प्लॅनमध्ये ‘डिस्ने + हाॅटस्टार’सह जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउड आदी अॅप्सचा फ्री अॅक्सेसही मिळणार आहे.
सब्सक्रिप्शन केवळ मोबाइलसाठीच..
दरम्यान, ‘जिओ’च्या 499 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना ‘डिस्ने + हाॅटस्टार’च ‘सब्सक्रिप्शन’ मिळत असले, तरी ते केवळ मोबाइलसाठीच वापरता येतं. त्याचा वापर ‘कम्प्यूटर’ वा टीव्हीवर करता येत नाही. कम्प्यूटर वा टीव्हीवर ‘डिस्ने + हाॅटस्टार’ पाहण्यासाठी ग्राहकांना ‘प्रीमियम सब्सक्रिप्शन’ घ्यावं लागणार आहे.