SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कसा आहे RRR सिनेमा, किती कोटी रुपये कमावले, वाचा रिव्ह्यू..

बाहुबलीला देशभरात प्रेम मिळाल्यानंतर दिग्दर्शक एसएस राजमौली (S.S.Rajamouli) यांच्या RRR सिनेमालाही प्रेक्षकांचा चित्रपटगृहांत दाटीवाटीने जाऊन तुफान प्रतिसाद मिळत आहे. आता चित्रपट समीक्षकांकडूनही या सिनेमाचे भरभरून कौतुक होतेय. त्यामुळे तगडी स्टारकास्ट असणाऱ्या या सिनेमाची चर्चा आता भारतभर आहे. आता या सिनेमाचे IMDb रेटिंग समोर आले आहे. सोशल मीडियावरही RRR ची मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. राम चरण, ज्यूनिअर एनटीआर, अलिया भट्ट आणि अजय देवगण स्टारर हा सिनेमा या वर्षातला सर्वात मोठा हिट सिनेमा ठरू शकतो. अशात या सिनेमाची IMDb रेटींग समोर आली आहे.

IMDb रेटींग आणि RRR चा धुमाकूळ..

Advertisement

विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिलेल्या या सिनेमाच्या स्टोरीची आता भलतीच चर्चा आहे. राजमौली यांच्या या सिनेमाबाबत IMDb वरही जलवा बघायला मिळत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशीच सिनेमाला चक्क 9.2 IMDb रेटिंग मिळालं आहे. ही रेटिंग साडे सात हजार लोकांच्या रिव्ह्यूजवर आधारित आहे. हे रिव्ह्यू देशात खूप महत्वाचे समजले जातात. यांना इतकं महत्व आहे कि, या रेटिंग्जवरून चित्रपट किती खास आहे आणि कितपत स्टोरी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल याची कल्पना आपल्याला येते. RRR हा सिनेमा अर्थातच ट्रेलर पाहून कल्पना येईल की, किती मनोरंजात्मक, साहसी दृश्यांनी भरलेला आहे.

आकडेवारीबद्दल अधिकच स्पष्ट बोलायच झालं तर 7,668 IMDb यूजर्सने म्हणजेच 80.9 टक्के यूजर्सने सिनेमाला 10 स्टार्स दिले आहेत. तर 4.9 टक्के प्रेक्षकांनी 9 रेटिंग दिलं आहे. तसेच 8.4 टक्के लोकांनी सिनेमाला 1 रेटिंग दिलं आहे. हा सिनेमा 3 तास 7 मिनिटांचा आहे. परंतु काही कमी दिलेल्या रेंटींगच्या आधारे विचार केला तर केवळ 8 टक्यांच्या आसपास लोकांनी 1 रेटिंग दिले आहे म्हणजे केवळ काही टक्के लोकांना हा चित्रपट आवडला नसेल किंवा चित्रपटाचा काही भाग आवडला नाही, असं समजलं तरी याचा फारसा फरक पडणार नाही. कारण असं दिसत आहे की, सिनेमाच्या प्रसिद्धीत नक्कीच वाढ होऊ शकते. हा सिनेमा 300 कोटी सहजपणे कमवेल असे अंदाजही आता बांधले जात आहेत.

Advertisement

कमाईवर एक झलक…

सिनेमा रिलीज झाल्यानंतर RRR ने नवा इतिहास रचला आहे. N.T. Rama Rao Jr. , Ram Charan या साऊथ सुपरस्टार्समुळे सिनेमाला पॉवरफुल समजले जातेय. प्रदर्शित झाल्यावर सिनेमाने नवे रेकॉर्ड्सही बनवायला सुरूवात केली आहे. अनोख्या शैलीने बॉलिवूड गाजवणारा अजय देवगण (Ajay Devgan) यात कमालीचा दाखवला आहे आणि अलिया भट्ट (Alia Bhatt) ने आपल्या लुकला सिनेमात अधिक ब्राईट ठेवल्याचं दिसतंय. अशा सर्वच स्टार मंडळींमुळे सिनेमा बॉलिवूड आणि साऊथ मध्येच नाही तर देशात बक्कळ कमाई करेल हे चित्र स्पष्ट झालंय.

Advertisement

तब्बल 300 कोटींपेक्षा जास्त बजेट असलेल्या या सिनेमाचा यूएस प्रिमिअर शोज बघण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं दिसलं. अशात अशी माहिती आली आहे की, यूएस प्रिमिअर शोजमधून RRR ने 3 मिलियन डॉलर्स म्हणजे अंदाजे 22 कोटी रूपये कमाई केली आहे. फक्त प्रिमिअरला इतकी कमाई करणारा यूएसमधील हा पहिला भारतीय सिनेमा ठरला आहे. आता देशातील स्क्रीन्स अजून वाढण्याची शक्यता असून हा सिनेमा चांगलाच गल्ला जमवून अनेक सिनेमांचं रेकॉर्ड मोडतो कि काय आता असंच वाटतंय.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement