SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): हाताखालील लोकांची उत्तम साथ मिळेल. विलंबावर मात करावी. व्याप वाढवणे टाळा. आजचा दिवस चांगला जाईल. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. घरात अधिकारी व्यक्तींची ऊठबस होईल. आज तुम्हाला डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. सरकारी कार्यालयात प्रलंबित कामे पूर्ण होतील. राजकीय संबंधात फायदा.

वृषभ (Taurus): घरच्यांना वेळ द्याल. वेळेचे आणि आर्थिक बाबींचे नियोजन करणे हिताचे. व्यावसायिक वसुलीचे संकेत. बॅंकेची कर्जमंजुरी. भागीदारीत सलोख्याचे वातावरण ठेवावे. आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी कळेल. घरातील मंडळींशी आदराने वागा. पक्षांना अन्नदान करा. स्वत:ला नवसंजीवनी देण्यासाठी वेळ मिळेल.

मिथुन (Gemini) : आजचा दिवस चांगला जाईल. सतत छान स्वभावाची माणसं भेटतील. कामाच्या पद्धतीत वारंवार बदल करू नका. परोपकाराची जाणीव ठेवावी. उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. अवास्तव अपेक्षा मनात बाळगू नका. मतभेदापासून दूर रहा. थोडा अश्यकतपणा वाटेल पण आराम केल्यास उत्साहित वाटेल. कोणताही खेळ तुम्हाला आळशी बनवत नाही म्हणून थोडं खेळा.

कर्क (Cancer) : यश मिळाले तरी नम्रतेने त्यात इतरांना सामावून घ्या. ‘जिभेची गोडी आनंद आणी’ हे लक्षात ठेवा. कामाची अचूक दखल घेतली जाईल. बौद्धिक छंद जोपासाल. एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. घरातील वयोवृद्धांचा मान राखा. दिवसाची सुरुवात उत्तम होणार नाही. परंतु काळजीपूर्वक कामे केल्यास चुका होण्याची शक्यता टळेल. प्रकृतीकडे लक्ष द्या.

Advertisementसिंह (Leo) : नम्रता महत्त्वाची. यश मिळाले तरी नम्रतेने त्यात इतरांना सामावून घ्या. आनंद एकत्र राहून साजरा करा. विरोधकांची तोंडे बंद होतील मुलांचे साहस वाढेल. बोलतांना भान राखावे. आजचा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येणार आहे. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा. तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. मित्राशी वस्तुस्थिती पडताळून पाहावी. लाँग ड्राईव्हला जावे.

कन्या (Virgo) : आजचा दिवस प्रगतीचा आहे. नवे कौशल्य शिका, आत्मनिर्भर बना. प्रगती कराल. यशस्वी व्हाल. प्रगतीला योग्य दिशा मिळेल. हातून चांगले लिखाण होईल. सरकारी कामे वेळेत पूर्ण करता येतील. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आई-वडिलांकडून साथ लाभेल. ताण कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या. किरकोळ आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

तुळ (Libra) : आनंद एकत्र राहून साजरा करा. यश डोक्यात जाऊ देऊ नका. व्यावहारिक निर्णय घ्या. खर्च वाढेल. चिकाटी सोडून चालणार नाही. जबाबदारी योग्यप्रकारे हाताळावी. धाडसी शब्द वापराल. जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका. घरातील मंडळींचे विचार पटणार नाहीत. समस्या समजून घेणे आवश्यक.

वृश्‍चिक (Scorpio) : आजचा दिवस बरा जाईल. व्यावहारिक निर्णय घ्या. आपण बरे आपले काम बरे असेच राहा. स्पष्ट बोलण्यावर भर द्याल. गोष्टी चटकन लक्षात घ्याल. धूर्तपणे वागण्याकडे कल राहील. परिवारासंबंधित कामे पूर्ण करा. प्रकृतीकडे लक्ष द्या आणि वेळेवर आजाराचे निदान करा. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा. मोकळ्या वेळेत आराम करण्याचा प्रयत्न करा.

Advertisementधनु (Sagittarius) : गोड बोलून काम पूर्ण करुन घ्याल. नवी जबाबदारी घेणे टाळा. फार हट्टीपणा करू नका. कामात तत्परता दाखवावी. गूढ गोष्टींकडे ओढ वाढेल. छुप्या शत्रूंवर विजय मिळवता येईल. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. विचारपूर्वक वागा. घरातील ताणतणामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. विचारांचे पालन करुन योग्य ती कृती करा. स्वतःला विश्रांती देणे गरजेचे.

मकर (Capricorn) : प्रयत्नांमध्ये सातत्य असल्यास यश मिळेल. प्रामाणिक राहा. बोलताना संयम राखा. मित्र आणि परिवारासह वेळ घालवा. अतिचिकित्सा करू नका. जोडीदाराची बाजू जाणून घ्यावी. मौल्यवान वस्तु खरेदी कराल. आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. मित्रपरिवारासह आदराने वागा. घरातील मंडळींची साथ लाभेल. आजचा दिवस चांगला जाईल. नवीन योजना केल्यास नुकसानच.

कुंभ (Aquarious) : आला दिवस मजेत जगा. कायदा पाळा. घरच्यांना वेळ द्या. संवादातून मार्ग काढा. संयम पाळा. जपून शब्द वापरा. मित्रांचा गोतावळा जमवाल. जास्त चौकसपणा दाखवाल. विचारपूर्वक निर्णय घ्या. अचानक खर्च वाढू शकतो. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल. घरातील मंडळींचे आदेश पाळा. मित्र मंडळीची गाठभेट होईल. आज डोकेदुखी होईल.

मीन (Pisces) : कुणाला कमी लेखू नका. गोड बोला, वाद टाळा. व्यावहारिक निर्णय हिताचे. सामंजस्य लाभाचे आहे. काही गोष्टींचा पुनर्विचार करावा. प्रयत्न करुन अडचणी सोडवाल. आज कंबर दुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास दुर्लश्र करु नका. तसेच आजच्या दिवशी आराम केल्यास उत्तम. फोनवर जास्त वेळ बोलणे टाळावे. स्पर्धा परीक्षांची तयारी करा.

Advertisement