SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘ही’ सीरिज ठरली भारतातील सर्वात लोकप्रिय वेबसीरिज, आयएमडीबीची मोठी घोषणा!

चित्रपटांच्या दुनियेत वेबसीरिजने आपली जागा बनविली आणि धुमाकूळ घालून अनेक देशांत विविध OTT प्लॅटफॉर्म्सने आपली लोकप्रियता वाढविली. आता याबाबतच मोठी बातमी आली आहे की भारतातील एक वेबसिरीज सध्या खूपच लोकप्रिय ठरली आहे. चित्रपट, टीव्हीसंबंधी माहिती देणारा जगातील सर्वात लोकप्रिय आणि अधिकृत स्रोत आयएमडीबीने आज एक घोषणा केली आहे.

आयएमडीबीने (IMDb) घोषणा करत माधुरी दीक्षितच्या ‘द फेम गेम’ (The Fame Game) या NETFLIX वरील वेबसीरिजबद्दल आपलं मत मांडलं आहे. आयएमडीबीने सांगितले की, 3 जानेवारी ते 14 मार्च कालावधीमधील त्यांच्याकडे असलेल्या डेटाच्या आधारे ‘द फेम गेम’ ही वेबसीरिज वर्षभरातील भारतातील सर्वात लोकप्रिय वेबसीरिज ठरली आहे. जगातील क्रमवारीबद्दल बोलायचं झालं तर ही सीरिज 62व्या नंबरवर आहे तसेच आयएमडीबीच्या सर्वाधिक रेटिंग्स मिळवणाऱ्या वेबसीरिजमध्ये या सीरिजने 34वा नंबर (7.1 रेटिंग) मिळवला आहे.

Advertisement

माधुरी दीक्षितचा अतिशय छान अभिनय असलेली ‘द फेम गेम’ ही वेबसीरीज भारतासह, यूके, बांगलादेश, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युएस, पाकिस्तान व संयुक्त अरब अमिरातीमध्ये प्रेक्षकांच्या पेजव्ह्यूजवर आधारित सर्वात लोकप्रिय सीरिज ठरली आहे. या सीरिजमध्ये स्टारडम मिळाल्यानंतर काय आयुष्य असतं किंवा त्यानंतरच्या चमकत्या झगमगाटामागील वास्तव दाखवलं आहे. अभिनेत्री हरवल्यावर कुटुंबातील सीक्रेट गोष्टी आणि भूतकाळातील जखमा हे सर्व अत्यंत सुरेख पद्धतीने टिपण्यात आले आहे. माधुरीने साकारलेली अनामिका आनंद आता लोकांच्या पसंतीस उतरली आहे.

दरम्यान माधुरी दीक्षितची भूमिका लोकांना चांगली पसंतीला पडेल असं वाटतं. यामध्ये माधुरी दिक्षित सोबत अभिनेता संजय कपूरदेखील लीड रोलमध्ये आहे. या वेबसिरीजमध्ये तुम्हाला एका कुटुंबातलं भांडण दाखवण्यात येणार आहे. ही वेबसीरिज प्रदर्शित झाल्यानंतर सीरिजमध्ये ‘शोभा त्रिवेदी’ म्हणून पोलिसाची भूमिका पार पाडणारी राजश्री देशपांडे, सीरिजमधील टॉप रँक स्टार म्हणून ट्रेंडमध्ये होती. राजश्री देशपांडेने ‘द फेम गेम’च्या आधी सेक्रेड गेम्स, अँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि द स्काय इज पिंक यासारख्या मोठ्या प्रोजेक्ट्समध्येही काम केले आहे. याशिवाय अभिनेता मानव कौल, लक्षवीर सरन, मुस्कान जाफरी या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement