SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार 400 कोटी रुपये, ‘या’ योजनांचे अनुदान लवकरच मिळणार..!

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, शेतीतून भरघोस उत्पादन घेता यावे, यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदतीचा हात देत असते. या योजनांद्वारे सरकारकडून शेतकऱ्यांना पिकांसाठी, शेती औजारांसाठी अनुदानाच्या रुपाने मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येत असतो..

सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.. 2021-2022 या आर्थिक वर्षात कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुमारे 1200 कोटी रुपयांचे अनुदान 31 मार्चअखेर दिले जाणार होते. शासनाने आतापर्यंत तब्बल 820 कोटींचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग करण्यात आले आहे..

Advertisement

शेतकऱ्यांना मिळणार 400 कोटी

शासनाचे हे अनुदान ‘डीबीटी’ (Direct Benefit transfer) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत थेट जमा करण्यात आले आहे. उर्वरित सुमारे 400 कोटी रुपयांचे अनुदान आता 31 मार्चअखेर दिले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली असून, लवकरच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होतील, असे कृषी आयुक्तालयाकडून सांगण्यात आले..

Advertisement

दरम्यान, याआधी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळे अर्ज सादर करावे लागत. विशेष म्हणजे, त्यासाठी आवश्यक कागदपत्र एकसारखीच असायची. वेगवेगळ्या योजनांसाठी अर्ज करताना, शेतकऱ्यांचा वेळ नि पैशांचाही अपव्यय होत होता.

‘महाडीबीटी’ प्रणालीबाबत..

Advertisement

ही बाब लक्षात आल्यानंतर कृषी विभागाने तंत्रज्ञानाचा वापर करून ‘महाडीबीटी’ (mahadbt) प्रणाली विकसित केली. या प्रणालीमुळे आता ‘एक शेतकरी – एक अर्ज’ पद्धतीचा अवलंब केला जात आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी वेगवेगळे फॉर्म भरावे लागत नाही. एकाच अर्जावर कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो.

शिवाय, समजा एखाद्या वर्षी संबंधित योजनेसाठी शेतकऱ्यांची निवड झाली नाही, तर पुढच्या वर्षी तोच फॉर्म वापरता येतो. त्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा फाॅर्म भरण्याची गरज पडत नाही.

Advertisement

दरम्यान, ‘महा डीबीटी’ पोर्टलवर आतापर्यंत 22 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ‘महाडीबीटी’ पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी आता घरबसल्या वेगवेगळ्या योजनांसाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध योजनांत पारदर्शकपणा आला. तळागाळातील शेतकऱ्यांनाही शासकीय योजनांचा लाभ घेणे शक्य झाल्याचा सांगण्यात आले..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement