SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जिओचा ग्राहकांना धक्का! रिचार्ज प्लॅनमध्ये झाले मोठे बदल, वाचा..

रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी अनेक खास ऑफर (Reliance Jio Recharge Offer)आणत असते. ज्यामध्ये तुम्ही अधिक डेटासह अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेऊ शकता. Reliance Jio ने सध्याच्या तीन जिओ फोन प्लॅनच्या किंमती वाढवल्या असल्या तरी 75 आणि 91 रुपयांचा रिचार्ज उपलब्ध आहे पण यात तुम्हाला डेटा चा लाभ मिळणार नाही. आता एक नवीन ऑल-इन-वन प्लॅन देखील जिओने लॉंच केलाय, जो 28 दिवसांच्या वैधतेसह 152 रुपयांना येतो. तसेच 0.5GB दररोज डेटा, अमर्यादित कॉलिंग 300 मोफत एसएमएस मिळतील. सोबतच प्लॅनमध्ये Jio Apps चे फ्री सबस्क्रिप्शन मिळते.

JioPhone च्या तीन रिचार्ज प्लॅनच्या नवीन किंमती:

Advertisement

Jio च्या ऑल-इन-वन प्लॅन ज्याची किंमत 155 रुपये होती, त्या रिचार्ज प्लॅनची किंमत 186 रुपये झाली आहे. यामध्ये तुम्हाला 28 दिवस प्लॅन वैधता, दररोज 1GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 एसएमएस हा फायदा मिळणार आहे. याशिवाय Jio Apps चे सबस्क्रिप्शन मोफत मिळेल.

पुढील रिचार्ज प्लॅन, ज्याची किंमत 186 रुपये होती, त्या रिचार्ज प्लॅनची किंमत 222 रुपये झाली आहे. यात तुम्हाला 28 दिवस प्लॅन वैधता, दररोज 2GB डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 SMS हा लाभ मिळणार आहे. याशिवाय Jio Apps चे सबस्क्रिप्शन मोफत मिळेल.

Advertisement

पुढील ऑल-इन-वन रिचार्ज प्लॅन ज्याची किंमत 749 रुपये होती, त्या रिचार्ज प्लॅनची किंमत 899 रुपये झाली आहे. आहे. या प्लॅनमध्ये 28 दिवस 2GB डेटा मिळेल. हा प्लॅन 336 दिवसांसाठी दिल्या जाणाऱ्या प्लॅनचा एकूण 24 जीबी डेटा एक्सेस देईल. या प्लॅनमध्ये दररोज 50 एसएमएस, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि मोफत Jio Apps चा फायदा मिळेल.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement