SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कांदा आणतोय शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, कसा मिळतोय कांद्याला भाव, जाणून घ्या..

राज्यात मागील नोव्हेंबर महिन्यात कांदा लागवड पूर्ण होऊन आता तो आता काढणीस आला आहे. पण अनेक शेतकऱ्यांना बदलत्या हवामानामुळे आणि अवकाळीमुळे मोठ्या नुकसानाला समोर जावं लागलं आहे. कांडा पिकावर झालेल्या करपा रोगाच्या प्रादुर्भावाने सर्वाधिक कांदा लागवड घेत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांद्यावर नांगर फिरवला होता. अहमदनगर जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात उन्हाळी कांदा काढणीला वेग आला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात कांद्यांच्या लागवडी झाल्या असल्याची माहिती आहे.

अवकाळीनंतर शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा नव्या जोमानं कांदा लागवड केली होती. फवारण्या, योग्य काळजी घेऊन, दिवस आणि रात्रपाळी करून पाणीही दिलं आणि मोठ्या कष्टाने पुन्हा पीक फुलवलं. हे सगळं करताना रासायनिक खते व औषधांचा वाढता खर्च, मजुरांचा खर्च अशा अनेक समस्यांना तोंड देत शेतकर्‍यांनी आपला कांदा आणला. आता हळूहळू कांदा निघत आहे. एप्रिलनंतर पडणाऱ्या कडक उन्हात काढण्याऐवजी यंदा फेब्रवारीतच उन्हाचे हटके चटके बसू लागल्याने या अचानक पडणाऱ्या उन्हामुळे कांदा काढण्याचं काम लवकरच सुरु झालं आहे.

Advertisement

पण आता असं होत आहे की, काही शेतातील कांदा उन्हामुळे खराब होत आहे. त्यामुळे मार्केटमध्ये कांदा जास्त प्रमाणात आल्याने मागणीऐवजी पुरवठा जास्तच वाढत असल्याने शेतकरी नुकसान आपल्या पदरी घेत आहेत. शेतकरी मातीमोल भाव मिळत असल्यानं कांद्यानं शेतकर्‍यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणल्याची स्थिती आहे. आधीच राज्यातील शेतकरी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करतोय. अशातच त्यांच्या शेतमालाला दर मिळत नसल्याने त्याच्यावर दुहेर संकट आलं आहे.

महाराष्ट्र्रात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे क्षेत्र असते. मात्र, काही वर्षापांसून तापमानात, हवामानात होणाऱ्या बदलामुळे अनेक पिकांच्या पेरणी-काढणीचे शेतकऱ्यांचे अंदाज फोल ठरतात. सध्या या कांद्याला दर मिळत नसल्याने बळीराजा चिंतेत आहे. उन्हाळी कांदा काढणीला सध्या वेग आला असला तरी जेवढे उत्पन्न यायला हवे त्या उत्पन्नात निम्म्याने घट झाली आहे. अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यानं शेतकर्‍यांचा खर्च देखील निघणार नाही, असे चित्र दिसत आहे.

Advertisement

सुरुवातीच्या कांद्याला 1200 ते 1400 रुपयांचा जागेवर भाव होता आता तो आणखी खाली आला आहे आणि आता 600 ते 800 रुपयांच्या जवळपास भाव मिळत आहे. काही जिल्ह्यात अजूनही कांदा काढणी चालूच आहे. काही ठिकाणी अजूनही बराच कांदा काढणीचा काल बाकी आहे. एप्रिल महिन्यापायांत शेतकर्‍यांचा कांदा काढून होईल असा अंदाज आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा सर्व कांदा काढून झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात येईल, त्यामुळं भावात अजून मोठी घसरण होण्याचे शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत दिसत आहे. बाजार समितीत जरी कांद्याला 1 हजार 200 ते 1 हजार 400 रुपयांचा दर मिळत असला तरी जागेवर कांद्याला 600 ते 800 रुपयांचा भाव मिळत आहे. त्यातच उत्पन्न घटल्याने खर्चाचा ताळमेळ शेतकऱ्यांचा बसत नाही.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement