आमदार लक्ष्मण जगताप यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यभरातील विद्यापीठे व महाविद्यालयांकडून विविध शैक्षणिक कारणांसाठी घेतली जाणारी अनामत रक्कम तथा डिपॉझिट संबंधित विद्यार्थ्यांना परत देणे बंधनकारक असल्याचा मुद्दा उपस्थित केला असता उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यावर सकारात्मक उत्तर दिले आहे.
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये (Budget session) राज्यातील महाविद्यालये, विद्यापीठ विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी डिपॉझिट घेतात, हे डिपॉझिट परत देणे बंधनकारक असताना, विद्यार्थ्यांच्या हक्काच्या या रक्कमेवर डल्ला मारला जात असल्याची मोठी बाब आमदार लक्ष्मण जगताप (MLA Laxman Jagtap) यांनी अधिवेशनात जाहीरपणे मांडली. विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची अनामत रक्कम परत करण्याबाबत शासन स्तरावर काही कार्यवाही केलीय का? असा जाब राज्य सरकारला विचारला.
महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांमध्ये व विद्यापीठांत विविध व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रत्येक वर्षी लाखो विद्यार्थी प्रवेश घेतात. अनेक प्रवेश घेणाऱ्या या विद्यार्थ्यांकडून महाविद्यालये व विद्यापीठांत अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी शुल्क घेतले जाते. त्यांच्याकडून विविध शैक्षणिक गोष्टींसाठीही अनामत रक्कम घेतली जाते.जे डिपॉझिट घेतले जाते त्यामध्ये ग्रंथालयातील पुस्तके, प्रयोगशाळेतील साहित्य हाताळणी, क्रीडा साहित्य अशा गोष्टींचा समावेश आहे. अशा या अनेक कारणांसाठी विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये अनामत रक्कम म्हणून घेतली जाते.
अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना विद्यापीठांनी व महाविद्यालयांनी अनामत रक्कम परत करणे कायद्याने बंधनकारक आहे. पण शैक्षणिक कारणांसाठी घेतलेली अनामत रक्कम विद्यार्थ्यांना परत देण्यासाठी विद्यापीठे आणि महाविद्यालये टाळाटाळ केली जाते, असं आमदार लक्ष्मण जगताप अधिवेशनात म्हणाले.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांचं उत्तर…
विद्यार्थ्यांचे हे डिपॉझिट परत करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी विद्यार्थ्यांना देय असलेली अनामत रक्कम (Students will get deposit of college) तात्काळ परत देण्याबाबत विद्यापीठांना व महाविद्यालयांना निर्देश देण्यात आल्याचे लेखी उत्तर दिले आहे. त्यामुळे आता राज्यभरातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit