SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्त्री, पैसा, मैत्री आणि व्यवहारांबद्दल आचार्य चाणक्य काय सांगतात? जाणून घ्या चाणक्यनीतीतील काही महत्वाच्या गोष्टी..

सध्याच्या जगात अनेक जण मोटिव्हेट होण्यासाठी काही व्हिडीओ तर काही ऑडिओ ऐकत असतात. पण असे कित्येक जण आजही आहेत जे तात्पुरते प्रभावित नाही होत. जुन्या काळातील काही गोष्टी ऐकल्या असतील किंवा शाळेत आपण आचार्य चाणक्य (Aacharya Chanakya) यांच्याविषयी नक्कीच ऐकलं असेल. अशा आचार्य चाणक्य यांच्यापासून अनेक लोक आजही प्रभावित आहेत. त्यांचे विचार आजही काही लोक आचरणात आणतात. त्याला काही कारणेही आहेत. चार्यांचे थोर विचार हे महत्वाचे कारण आहे.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; संपूर्ण जॉब अपडेट पाहा एका क्लिकवर

Advertisement

आचार्य चाणक्य हे प्राचीन आपण भारतातील प्राचीन इतिहासात डोकावलो तर आपल्याला ते भारतीय शिक्षक, तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ आणि राजेशाही आचार्य चाणक्य असं कित्येक काही होते, असे दिसेल. तेव्हा आचार्य चाणक्य यांनी पहिले मौर्य सम्राट चंद्रगुप्त यांना सत्तेवर आणण्यासाठी अपार मदत केली….

मौर्य साम्राज्याच्या स्थापनेपासून अनेक दिवसांपर्यंत त्यांनी साम्राज्याच्या कारभारात अनेक मार्गदर्शनपर सल्ले देऊन आपली महत्त्वाची भूमिका बजावली. आचार्य चाणक्य यांनी सम्राट चंद्रगुप्त आणि त्याचा मुलगा बिंदुसार या दोघांचे मुख्य सल्लागार म्हणून काम केले. आचार्य चाणक्य यांची पारंपारिकपणे ओळख कौटिल्य किंवा विष्णुगुप्त अशी केली जाते, ज्यांनी अर्थशास्त्र हा प्राचीन भारतीय राजकीय ग्रंथ लिहिला, हा ग्रंथ अंदाजे तिसर्‍या शतकाच्या दरम्यानचा आहे.

Advertisement

मूर्खशिष्योपदेशेन दुष्टस्त्रिभरणेन ग ।
दुःखितैः संप्रयागेन पंडितो-प्यन्वसिदति ।

ग्रंथातील पहिल्या अध्यायाच्या चतुर्थ श्लोकात आचार्य चाणक्य यांनी म्हटले की, आपल्या आयुष्यात ज्या व्यक्ति व्यवहारामध्ये दु:खी असतात, अशा लोकांशी व्यवहार करून ज्यांची संपत्ती नष्ट झाली आहे, अशा व्यक्तींशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवणे आपल्याला तोट्याचे ठरू शकते.

Advertisement

प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या स्वभावाची असते. त्यानुसार प्रत्येकाच्या घरात वेगळेपण असते. घराची बहुतेक प्रसन्न वातावरणाची मदार स्त्रियांवर असते. आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या घरात दुष्ट स्त्रिया असतात, त्या गृहस्थाची स्थिती अत्यंत बिकट, गरीब बनलेली असते, कारण प्रत्येक गोष्ट करताना त्या गोष्टीवर दुसऱ्या कोणाचे नियंत्रण असते किंवा एखाद्या गोष्टीत बाधा आणणं स्त्री अथवा काही पुरुषांकडून सतत चालू असतं. मग सहन करत करत अशा व्यक्ति मनातून खूप खचत जातात. त्यांचे स्वत्व मरते आणि ते हळूहळू शांत होत जातात…

तसेच वाईट स्वभावाचा मित्र सुद्धा विश्वास ठेवण्यासारखा नसतो, कारण लक्षात ठेवा की, वाईट स्वभाव नेहमीच गोड़ असतो. त्यामुळेच असे मित्र तुम्हाला कधीही फसवू शकतात. तुमच्या हाताखाली काम करणारा नोकर किंवा कर्मचारी, जो तुमच्यासमोर उलट उत्तर देतो, तो कधीही तुमचे असह्य नुकसान करून तुम्हाला धोका देऊ शकतो आणि तो स्वतः विश्वासास पात्र नाही हेही दाखवून देतो.

Advertisement

तसेच, या अध्यायात चाणक्याने लिहिले आहे की, तुम्हाला कुठलाही त्रास किंवा मोठे संकट टाळण्यासाठी पैशाचे रक्षण केले पाहिजे, अतिप्रसंग वा संकटात गरज पडल्यास पैसा खर्च करूनही महिलांचे संरक्षण केले पाहिजे. पण महिला आणि पैसा असला तरीही माणसाने स्वतःचे आणि कुटुंबाचे संरक्षण करणे आवश्यक आहे, असं आचार्य चाणक्य म्हणतात.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement