SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बिग ब्रेकिंग : चेन्नई सुपर किंग्जने कर्णधार बदलला, धोनीऐवजी ‘हा’ खेळाडू करणार संघाचे नेतृत्व..!

आयपीएलच्या 15 व्या पर्वास येत्या 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. स्पर्धा दोन दिवसांवर आलेली असतानाही, अनेक टीमसमोरील अडचणी संपलेल्या नाहीत. काही दिग्गज खेळाडूंनी ऐनवेळी स्पर्धेतून माघार घेतली, तर काहींना व्हिसाची अडचण आली. काही देशांनी त्यांचे खेळाडू सोडण्यास नकार दिला..

आता चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी, त्यातही कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या फॅन्ससाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या कर्णधार पदावरुन दूर झाला असून, आता अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा याच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Advertisement

पुर्वनियोजीत धोरणानुसारच हा बदल करण्यात आल्याची माहिती चेन्नई संघ व्यवस्थापनाने दिली आहे. ‘सीएसके’ आणि धोनी, हे समीकरण आयपीएलच्या सुरुवातीपासून जमून आले होते. धोनीशिवाय ‘सीएसके’ची कल्पनाही चाहते करु शकत नाहीत. ‘सीएसके’मधील तो सर्वात जुना, अनुभवी नि विश्वासू खेळाडू, कॅप्टन राहिलाय…

जाडेजाच्या खांद्यावर धुरा
‘आयपीएल’साठी मेगा ऑक्शन होण्यापूर्वीच झालेल्या रिटेन्शन प्रक्रियेतच धोनीने आपला पहिला क्रमांक रवींद्र जाडेजासाठी सोडला होता. त्याच वेळी भविष्यात धोनीनंतर चेन्नईचा कॅप्टन जाडेजा असेल, हे स्पष्ट झाले होते. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले असून, आता चेन्नई संघाची धूरा जाडेजाच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे..

Advertisement

दरम्यान, ‘सीएसके’च्या कॅप्टनपदी धोनी आता राहिलेला नसला, तरी एक खेळाडू, विकेटकिपर म्हणून तो यंदाची ‘आयपीएल’ स्पर्धा खेळणार आहे. कदाचित 40 वर्षीय धोनीची ही अखेरची आयपीएल असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे धोनीच्या मार्गदर्शनाखाली भविष्यातील कॅप्टन तयार करण्यासाठी यंदाच जाडेजाला संधी दिल्याचे बोलले जात आहे..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement