SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राज्यात सलग 4 दिवस बँका राहणार बंद; आजच्या आजच बँकांचे कामे घ्या उरकून

सध्या महाराष्ट्रातील एसटी महामंडळाचे विलीनीकरण करण्यावर वातावरण पेटले असताना बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बँकेच्या व्यवहारांवर आणि राज्यातील नागरिकांच्या अर्थजीवनावर विशेष परिणाम होणार आहे. येत्या दोन दिवसात देशभरात सार्वजनिक उद्योगांमधील खासगीकरण व नवा कामगार कायद्याविरोधात भारतीय मजदूर संघ वगळता देशातील बऱ्याच संघटनांनी संप (bank strike) पुकारला असल्याचं कळतंय.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; संपूर्ण जॉब अपडेट पाहा एका क्लिकवर

Advertisement

संपात कोणत्या संघटनांचा समावेश..?

सर्व मध्यवर्ती कामगार संघटना, कर्मचारी संघटना, उद्योग तसेच बँक, विमा उद्योगातील कर्मचारी संघटना आणि असंघटित क्षेत्रातील सर्व कामगार संघटना यांचा संपात समावेश असणार आहे. राज्यातील सर्व औद्योगिक कामगारही या संपात सहभागी होणार आहेत.

Advertisement

संपामुळे बँका बंद राहणार..?

देशातील या संघटनांचा संप येत्या 28 मार्च आणि 29 मार्चला होणार आहे. माहितीनुसार, बँकांचा संप जरी असला तरी मार्च महिन्याखेर संपाच्या दोन दिवस आधी म्हणजेच 26 मार्च रोजी चौथा शनिवार असल्याने सरकारी व इतर काही खाजगी बँकांना सुट्टी असते. तर 27 मार्च रोजी रविवार येत असल्यानेही सर्वच बँकांना सुट्टी असते. त्यामुळे बँकांचे कामकाज ठप्प असते. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी सुट्टी आल्यानंतर त्यापाठोपाठ 28 आणि 29 मार्च रोजी संप येत असल्याने सलग चार दिवस बँका बंद राहतील. यामुळे बँकेतील आपली कामे ग्राहकांनी लवकर उरकून घ्यावी.

Advertisement

अधिक माहिती अशी की, हा संप नवीन कामगार कायद्याच्या विरोधात असणार आहे. तसेच सरकार सरसकट सर्व सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे खासगीकरण करू पाहत आहे, त्या विरोधात हा संप आहे. सार्वजनिक आणि खासगी उद्योगांमधून कायमस्वरूपी रिक्त जागा न भरता सरसकट कंत्राटी पद्धतीचा वापर करून पदांची भरती केली जाते. त्याला विरोध करण्यासाठी तसेच नवीन कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी हा संप पुकारण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने चार नवे कामगार कायदे मंजूर करून घेतले आहेत. त्यामुळे 29 कामगार कायदे बाद होऊन त्या जागी कामगारांचे हक्क हिरावून घेणारे हे चार कामगार कायदे अंमलात येणार आहेत. मात्र केंद्राकडून हे कायदे अगदी जसे आहेत तसे अंमलात आणण्यासाठी नियम पारित करून घेतले जात आहेत. त्यामुळे केंद्राने केलेले नवे कामगार कायदे रद्द करावेत किंवा महाराष्ट्रात हे कायदे अंमलात आणायचे असल्यास त्यात काही योग्य बदल करून आणि कामगार संघटनांची संमतीशिवाय ते न आणण्याची हमी द्यावी, सरकारी विभागांचे खासगीकरण थांबवावे, कंत्राटी पद्धत बंद करावी, अशा विविध मागण्या कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात आल्याची माहिती कष्टकऱ्यांचे ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर, अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीचे नितीन पवार यांनी दिली.

Advertisement

बँकांतील ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन (एआयबीईए), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन (एआयबीओए), बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया (बीईएफआय) या तीन संघटना मिळून राज्यातील पाच लाखांहून अधिक बँक कर्मचारी, अधिकारी संपात सहभागी होणार आहेत. संपात बहुसंख्य बँक कर्मचारी आणि बँक अधिकाऱ्यांची ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (एआयबीओए) ही दुसऱ्या क्रमांकाची मोठी संघटना सहभागी होत असल्याने स्टेट बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँका वगळता इतर सर्व बँकांचे कामकाज ठप्प होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशनचे महासचिव देविदास तुळजापूरकर यांनी दिली.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement