SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘आयपीएल’च्या तिकिट विक्रीला सुरुवात, ‘येथे’ करा ऑनलाईन बुकिंग..!

इंडियन प्रीमियर लीग, अर्थात ‘आयपीएल’च्या (IPL 2022) यंदाच्या 15 व्या पर्वास येत्या 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. चेन्नई सुपर किंग्स व कोलकाता नाइट रायडर्स (CSK Vs KKR) यांच्यातील सामन्याने ‘आयपीएल’ स्पर्धेची सुरुवात होणार आहे. त्याआधी क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे..

कोरोनामुळे यंदा ‘आयपीएल’मधील लिगचे 70 सामने पुण्या-मुंबईत खेळवले जाणार आहेत. गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने महाराष्ट्र सरकारने या स्पर्धेसाठी सर्व मैदानावर 25 टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ‘बीसीसीआय’ने (BCCI) आयपीएल सामन्यांच्या तिकीट विक्रीला सुरुवात केली आहे..

Advertisement

Advertisement

मुंबईतील वानखेडे स्टेडियम व डीवाय पाटील स्टेडियमवर प्रत्येकी 20-20 सामने, सीसीआय स्टेडियममध्ये 15, तर पुण्यातील एमसीए स्टेडियममध्ये 15 सामने खेळवले जाणार आहेत. या सामन्यांसाठी 23 मार्च म्हणजेच, आज दुपारी 12 वाजेपासून तिकीटांची विक्री सुरू झाली आहे.

आयपीएलच्या सर्व सामन्यांचे तिकीटे प्रेक्षकांना ‘आयपीएल’च्या अधिकृत वेबसाइटवर खरेदी करता येणार आहेत. या वेबसाईट पुढीलप्रमाणे

Advertisement

असे आहेत तिकीटांचे दर..
‘बूक माय शो’च्या वेबसाइटनुसार, 26 मार्चला चेन्नई सुपर किंग्स व कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात पहिला सामना होत आहे. या सामन्यासाठी चार प्रकारचे तिकीटे उपलब्ध आहेत. त्यात 2500, 3000, 3500 आणि 4000 रुपयांचे तिकीटे असणार आहेत.

इतर सामन्यांसाठी तिकीटांचे दर 800 रुपयांपासून 4000 रुपयांपर्यंत आहेत. त्यात डीवाय पाटील स्टेडियमसाठी- 800 ते 2500 रुपये, वानखेडेवर- 2500 ते 4000 रुपये, ब्रेबाॅन स्टेडियमवर – 2500 ते 3000, तर पुण्यातील स्टेडियमसाठी- 1000 ते 8000 रुपयांपर्यंत तिकीटाचे दर आहेत.

Advertisement

 

Advertisement