SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अ‍ॅमेझॉनवर स्वस्तात खरेदी करा टीव्ही, ‘या’ ब्रँडेड टीव्हींवर मिळतोय भरगोस डिस्काउंट..

सध्या सगळीकडेच सेल च्या निमित्ताने कंपन्या अनेक ऑफर्स ठेवत असतात आणि आपल्या वस्तू घरपोहोच मिळत असल्याने लोक ऑनलाईन ऑर्डर करत असतात. आता ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने (Amazon) फॅब टीव्ही फेस्ट (Fab TV Fest) सेलची घोषणा केली आहे. या सेलला 20 मार्चपासून सुरू झाला असून हा सेल 25 मार्च 2022 पर्यंत सुरू राहील. या सेलमध्ये अनेक नवनवीन स्मार्ट टीव्हींवर आकर्षक डिस्काउंट दिले जात आहे.

▪️​LG च्या स्मार्ट टीव्हीवर आकर्षक ऑफर

Advertisement

Fab TV Fest सेलमध्ये LG च्या स्मार्ट टीव्हींना तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. या सेलमध्ये एलजी कंपनीचे 32 इंच ते 55 इंच पर्यंतचे अनेक छान बेस्ट सेलिंग स्मार्ट टीव्ही तुम्ही 17,499 रुपये या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करू शकता. तर 43 इंच आणि 55 इंच एलजी नॅनोसेल टीव्ही 4K Ultra सीरिज स्मार्ट टीव्ही फक्त रु. 45,999 या सुरुवातीच्या किंमतीमध्ये विकत घेऊ शकता.

▪️ ​OnePlus कंपनीचे स्मार्ट टीव्ही आणि ऑफर

Advertisement

Amazon Fab TV Fest सेलमध्ये OnePlus च्या स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काउंट देत OnePlus TV Y सीरिज आकर्षक डिस्काउंटसह उपलब्ध आहे. OnePlus या कंपनीचा स्मार्ट टीव्ही जर तुम्हाला खरेदी करायचा असेल, तर तुम्ही HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केला तर 1,500 रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटचा फायदा आणि ज्यांच्याकडे सिटी बँक क्रेडिट कार्ड आहे, अशा लोकांनी याचा वापर करून खरेदी केली तर त्यांनाही 1,500 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. OnePlus Y1s सीरिज 32 इंच स्मार्ट टीव्ही तुम्ही 16,499 रुपयांस खरेदी करू शकणार आहेत.

▪️ ​Redmi कंपनीच्या स्मार्ट टीव्हीवर खास ऑफर

Advertisement

तुम्ही जर रेडमीचे फॅन असाल तर तुम्हाला स्वस्तात मस्त स्मार्ट टीव्ही खरेदी करताना फायद्याचं ठरेल. सेल तुमच्या खूपच फायद्याचा ठरेल. त्यासाठी तुम्हाला Amazon Fab TV Fest सेलमध्ये 32 इंच आणि 65 इंच स्मार्ट टीव्ही खरेदी करावा लागेल. या टीव्हीची सुरुवाती किंमत 13,499 रुपये आहे. बजेट जास्त असेल आणि आणखी चांगली क्वालिटी हवी असेल तर काही दिवसांपूर्वीच लाँच झालेला Redmi TV X 4K सीरिजच्या 43 इंच आणि 65 इंच स्मार्ट टीव्हीला 28,999 रुपयांपासून खरेदी करता येईल.

▪️ ​Samsung कंपनीचे धमाकेदार स्मार्ट टीव्ही स्वस्तात

Advertisement

जगात आपला नेहमीच ठसा उमटवणाऱ्या samsung कंपनीच्या Samsung Crystal 4K Pro सीरिजच्या 43 इंच च्या टीव्हीला तुम्ही 38,990 रुपये या सुरुवातीच्या किंमतीत विकत घेऊ शकता. येथे ऑनलाईन खरेदी करताना एचडीएफसी बँकेच्या कार्डचा वापर करून खरेदी केल्यास 10 टक्के म्हणजेच 1750 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळेल. अ‍ॅमेझॉन पे रिवॉर्डसह 200 रुपये कॅशबॅकही मिळेल.

▪️​Sony कंपनीच्या स्मार्ट टीव्हीवर आकर्षक सूट

Advertisement

Amazon Fab TV Fest सेलमध्ये Sony कंपनीच्या टीव्हीवर तब्बल 15,000 रुपयांपर्यंतचा फ्लॅट डिस्काउंट मिळेल. सोनी कंपनीच्या ब्राविया सीरिजच्या (Sony Bravia Series Smart TV) स्मार्ट टीव्हीला तुम्ही फक्त 23,999 रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता. याशिवाय, 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट (1500 रुपयांपर्यंत) मिळेल. Sony Bravia 4K Ultra HD सीरिज 74,990 रुपये सुरुवातीच्या किंमतीत सेलमध्ये आहे.

(नोट- वरील स्मार्ट टीव्हींच्या किंमतीत ऑफर्सनुसार काही बदल होऊ शकतो किंवा स्टॉक कधीही संपू शकतो, हा लेख तुम्हाला फायद्याची माहीती देण्यासाठी असून याची जबाबदारी ‘स्प्रेडइट’ घेत नाही.)
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement