SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुमच्या मोबाईलचा इंटरनेट स्पीड किती आहे? गूगलवर सर्च करा ‘हे’ 3 शब्द आणि घ्या जाणून..

इंटरनेट वापरणारे लोक इंटरनेटचा वेग कमी झाल्यानंतर खूप अस्वस्थ होतात. मग आपण इतरांना हॉटस्पॉटची मागणी करतो. अशावेळी आपल्याकडे कोणताही पर्याय नसल्याने ते वापरतो. पण तेही आपल्याला काही वेळेपुरतेच मिळते. पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही गुगलच्या माध्यमातून तुमचा डाउनलोड आणि अपलोड इंटरनेट स्पीड तपासू शकता. अनेक ॲप आणि वेबसाईट्स आपल्याला इंटरनेट स्पीड टेस्टिंग करण्यासाठी मदत करतात.

तुम्हाला सांगू इच्छितो की, Google ने स्पीड टेस्टसाठी मेजरमेंट लॅबसह (एम-लॅब) पार्टनरशिप केली आहे. माहितीनुसार, या टेस्टमुळे तुमच्या कनेक्शनच्या स्पीडच्या आधारे 40MB हून अधिक डेटा ट्रान्सफर होऊ शकतो. यासाठी तुमचा फक्त मोबाइल डेटाचा वापर होईल.

Advertisement

इंटरनेट स्पीड टेस्ट कशी करायची?

▪️ सर्वप्रथम तुम्हाला डिव्हाईसवर google.com उघडावे लागेल.

Advertisement

▪️ तुम्हाला गुगलवर Run Speed ​​Test असं सर्च करावे लागेल.

▪️ आता तुम्हाला ‘Internet Speed Test’ नावाचा एक बॉक्स दिसेल. ज्यात काही माहिती आहे.

Advertisement

▪️ ‘Check your Internet speed in under 30 seconds’ अशा ओळीने सुरुवात होणाऱ्या त्या माहितीमध्ये सर्वात खाली जा.

▪️ आता तुम्हाला RUN SPEED TEST असा एक पर्याय हायलाईट झालेला दिसेल. त्यावर क्लिक करा.

Advertisement

▪️ आता तुम्ही M-लॅबशी जोडले जाल आणि तुमच्या डिव्हाईसचा IP Address त्यांना शेअर केला जाईल.

▪️ त्या आपल्या आयपी ॲड्रेसने पुढील प्रोसेस आपोआप केली जाईल.

Advertisement

▪️ सर्वात आधी तुमच्या डिव्हाईसचा डाउनलोड स्पीड टेस्ट केला जाईल.

▪️ त्यानंतर अपलोड स्पीड टेस्ट केला जाईल. अशा रीतीने इंटरनेट स्पीड टेस्ट केला जाईल आणि तुम्ही हे पुन्हा करू शकता.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement