SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 22 मार्च 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी आता एका क्लिकवर

🎯 स्प्रेडइट – हेडलाईन्स, 22 मार्च 2022

✒️ बहुप्रतीक्षित भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) भागविक्रीसाठी केंद्र सरकारने भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’कडे सोमवारी अंतिम प्रस्ताव केला सादर

Advertisement

✒️ नवाब मलिकांचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम 4 एप्रिलपर्यंत वाढला, पाठदुखीचा त्रास असल्याने बेड उपलब्ध करून देण्यास कोर्टाची मंजुरी

✒️ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते CDS जनरल बिपिन रावत यांच्या मुलींना पद्मविभूषण; गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषणने सन्मानित

Advertisement

✒️ ऑस्ट्रेलिया-भारत सोमवारी आभासी शिखर परिषद होण्याच्या आधी ऑस्ट्रेलियाकडून भारताला भारतातील 29 पुरातन वस्तू करण्यात आल्या परत; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचे मानले आभार

✒️ गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा प्रमोद सावंत, सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, पक्षश्रेष्ठींनी टाकला विश्वास; लवकरच शपथविधीचा दिवस जाहीर केला जाणार

Advertisement

✒️ ओला इलेक्ट्रिक त्यांच्या बॅटरीमध्ये स्टोअरडॉटचे एक्सएफसी तंत्रज्ञान वापरणार, फक्त 5 मिनिटांत 0 ते 100 टक्के बॅटरी चार्ज करता येणार

✒️ मुंबई महापालिकेने जलमापकांची नोंद मोबाईलवर घेण्याचा केला नवा प्रयोग; पालिका कंत्राटदार नेमणार, पालिकेला 47 लाख 52 हजार रुपये मोजावे लागणार

Advertisement

✒️ काँग्रेसच्या काळात केवळ 112 छापे, मोदी सरकारने रेकॉर्ड तोडला, मोदी सरकारच्या काळात देशभरात तब्बल 2,974 ईडीच्या धाडी; सरकारची लोकसभेत माहिती

✒️ भिवंडी शहरातील खोका कंपाउंड परिसरात यंत्रमाग कारखान्याला भीषण आग लागल्याची घडली घटना, आगीत संपूर्ण कारखाना आणि तयार कपडे जळून खाक
➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement