SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महागाईचा डबल अटॅक; घरगुती गॅस LPG Cylinder च्या किमतीत झाली ‘एवढी’ वाढ, बघा, तुमच्या शहरात काय आहेत दर

मुंबई :

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर आता घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या (किंवा एलपीजी) किमतीही वाढलेल्या आहेत. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच आता एका सिलिंडरसाठी तुम्हाला ५० रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.

Advertisement

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन एलपीजी सिलिंडरच्या दरात बरेच दिवस वाढ करण्यात आलेली नव्हती. मात्र निवडणुका संपताच विनाअनुदानित सिलेंडर महाग झाले. 6 ऑक्टोबर रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत शेवटची वाढ करण्यात आली होती.

आधीच पेट्रोल-डीझेल, दुध अशा अनेक गोष्टींमुळे महागाई वाढत असताना सरकारने सामान्य लोकांना अजून एक जोर का झटका दिला आहे. भारतात पेट्रोल दरात (petrol rate) 80 पैशांनी वाढ केली आहे. मागच्या आठवड्यात काही कंपन्यांनी दरात दोन ते पाच रूपयांनी वाढ केली होती.

Advertisement

दोन वर्षात कोरोनाच्या काळात अर्थिक संकटात सापडलेला सामान्य नागरिक नुकताच उभारी घेत होता. एकाचवेळी सगळेचं दर वाढत असल्याने सर्वसामान्य जनता यामध्ये होरपळली जाईल. विशेष म्हणजे पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तेल कंपन्यांकडून (oil companies) पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यास सुरुवात झाली आहे.

 

Advertisement

महाराष्ट्रात कोणत्या शहरात काय आहेत दर :- 

पुणे – 952.5
नागपूर – 1,001.5
नाशिक – 953
औरंगाबाद – 958.5
मुंबई – 949.5

Advertisement