SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

“धनंजय मुंडे आणि माझ्यावर सिनेमा काढला तर..,” करूणा शर्मांच्या वक्तव्याने राज्यात पुन्हा खळबळ!

करुणा शर्मा या नुकत्याच पंढरपूर दौऱ्यावर आल्या असताना त्यांनी महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधत काही गंभीर आरोपही केले आहेत. करूणा शर्मा (Karuna Sharma) यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये (Kolhapur Election) उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपूरमध्ये याबाबतची घोषणा त्यांनी केली आहे. मात्र यावेळी बोलताना करूणा शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्यही केलं आहे.

करूणा शर्मा यांचं वादग्रस्त वक्तव्य:

Advertisement

“राजकारण कसं चालतं हे मी गेले 25 वर्षे पाहत आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि माझ्यावर चित्रपट निघाला तर तो चित्रपट सुपरहिट होईल. आमच्यावर चित्रपट निघाला तर सर्वांना कळेल की, महाराष्ट्रातील राजकारण कसं चालतं आणि येथील नेते कसे आहेत? करुणा मुंडेवर चित्रपट काढण्यासाठी अनेक दिग्दर्शक सध्या रांगेत उभे आहेत”, अशी टिप्पणी करुणा शर्मा यांनी केली आहे.

पुढे त्या म्हणाल्या, ” धनंजय मुंडे हे पाच-सहा मुलांचे वडील आहे. तरी अजूनही ते मंत्रीपदावर कसे? माझे पती धनंजय मुंडे यांनी मला तुरुंगात टाकले. पण त्याबद्दल कोणीही बोलायला तयार नाही. नेत्यांना बोलायचे असेल तर त्यांनी दिशा सॅलियन, पुजा चव्हाण आणि करूणा शर्मा यांसारख्या प्रकरणांवर बोलायला पाहिजे, असे आवाहनही करुणा मुंडेंनी केले आहे. करुणा मुंडेंच्या या आरोपाने व विधानाने आता राज्यात खळबळ उडाली आहे.

Advertisement

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) याना आमदारकी मिळाल्यानंतर दोनच वर्षात त्यांच्या निधनामुळे कोल्हापूरमध्ये पोटनिवडणुक लागली आहे. या जागेसाठी काँग्रेसने चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली आहे, तर दुसरीकडे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवार सत्यजीत कदम (Satyajit Kadam) यांना उमेदवारी मिळाली आहे.

धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांनंतर चर्चेत आलेल्या करुणा शर्मा आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आगामी कोल्हापूर पोटनिवडणुकीत त्या शिवशक्ती सेनेच्या अधिकृत उमेदवार असतील. करूणा शर्माही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. करूणा शर्मा यांनी नवीन पक्षाची स्थापना केली आहे. या पक्षाचं नाव ‘शिवशक्ती सेना’ असं आहे.

Advertisement

करुणा मुंडेवर सिनेमा काढण्यासाठी दिग्दर्शकांची लाईन लागली असल्याचा दावाही करूणा मुंडेंनी केला आहे. “मला अनेक पक्षांनी प्रवेशाच्या ऑफर केल्या होत्या. मात्र मला माझा पक्ष स्थापन करायचा होता, कारण माझ्यासारख्या अनेक मंत्र्यांच्या पत्नींवर अन्याय होत आहेत त्यातील अनेक महिला माझ्या संपर्कात आहेत”, असा दावाही करूणा शर्मा यांनी केला होता. तसेच 2024 मध्ये आपण परळीमधून धनंजय मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement