SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सततच्या पोटदुखीने हैराण झालात..? मग ‘हे’ घरगुती उपाय करुन पाहा..!

कोणत्याही वयात उद्भवणारी समस्या म्हणजे पोटदुखी.. अगदी लहान बाळांपासून ते वृद्धापर्यंत प्रत्येकाला अनेकदा पोटदुखीचा सामना करावा लागला असेल.. वेळी-अवेळी जेवण, अयोग्य खाणं-पिणं, बदलती जीवनशैली नि व्यायामाचा अभाव, यामुळे सध्या पोटाचे आजार वाढल्याचे दिसते.

बऱ्याचदा पोटदुखीचं कारण लक्षात येत नाही. लहान मुलांना जंत झाल्यामुळे त्यांचे पोट दुखतं, तर वयस्क व्यक्तींना अपचन, गॅस किंवा अन्य कारणांमुळे या समस्येला सामोरे जावे लागते. काही घरगुती उपायांनी पोटदुखीच्या समस्येवर मात करता येते. चला तर मग याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

पोटदुखीवर घरगुती उपाय

  • आल्याचा छोटासा तुकडा तोंडात धरा. हळूहळू आल्याचा रस पोटात गेल्यावर पोटदुखी कमी होत जाते.
  • मुळा पोटदुखीसाठी चांगला उपाय आहे. पोट दुखत असल्यास मुळ्याचा रस प्यावा. या रसात काळी मिरी व नाममात्र मीठ घालावं. हा रस प्यायल्यास पोटाला आराम मिळतो.
  • पोट दुखीसाठी हिंगही फार गुणकारी आहे. हिंगेची गोळी किंवा हिंग पावडर पाण्यात टाकून उकळून घ्यावी. हे पाणी नंतर नाभीवर ठेवा. पोटदुखी कमी होईल.
  • जिऱ्याचं पाणीही पोटदुखीसाठी फार उपयुक्त आहे. कोमट पाण्यात जिरे टाकून ते पाणी प्यायल्यास लगेच पोटाला आराम मिळतो.
  • पोट साफ नसल्यामुळे, तसेच पोटात जंत झाल्यानेही पोटदुखी होते. अशावेळी कोमट पाण्यात ‘इसबगोल’ घालून ते पाणी प्यावे. पोटाला लगेच आराम मिळेल.
  • कोऱ्या चहामध्ये (दूध न घालता) एक चमचा लिंबाचा रस टाकावा. त्यानंतर चहा प्यायल्यास जुलाब व पोटदुखी थांबते.
  • एक ग्लास सोडा मिक्स करुन प्यायल्यास पोटातील गॅस दूर होतात.
  • पोटात प्रचंड वेदना होत असल्यास, एक चमचा आल्याच्या रसात मध मिक्स करुन त्याचं सेवन करावं.

टीप –  वरील लेखातील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. डाॅक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://jio.sh/spreadit

Advertisement