SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बारावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, सुरक्षा दलात बंपर भरती सुरु..!

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (Central Industrial Security Force) इथे ‘हेड काँस्टेबल जनरल ड्यूटी’ या पदासाठी भरती होत आहे. तब्बल 249 जागांसाठी ही भरती होत असून, याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

पात्र उमेदवारांना त्यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. या नोकर भरतीबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

एकूण जागा – 249

या पदांसाठी भरती – हेड काँस्टेबल जनरल ड्यूटी (Head Constable General Duty)

Advertisement

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
इच्छुक उमेदवार बारावी पास असावा. तसेच बारावीदरम्यान संबंधित स्पोर्ट्समध्ये मार्क्स मिळालेले असावेत. मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलेलं असावं. पात्रतेच्या संपूर्ण अटी आणि शर्थी पूर्ण केलेल्या असाव्यात.

पगार -25,500 ते 81,100/- रुपये प्रति महिना

Advertisement

वयोमर्यादा-
इच्छूक उमेदवारांचे वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावं. एससी / एसटी उमेदवारांसाठी 5 वर्षे, तर ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षांपर्यंत वयात सूट देण्यात येणार आहे.

ही कागदपत्रं आवश्यक
– Resume (बायोडेटा)
– दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
– शाळा सोडल्याचा दाखला
– जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
– ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
– पासपोर्ट साईझ फोटो

Advertisement

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2022

ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
https://www.cisf.gov.in/

Advertisement

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा
https://drive.google.com/file/d/1_MgsnpXa6Az9syk6A0c6bceM0freBwC5/view

Advertisement