SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराल. आज तुम्ही मेहनत कराल आणि कोणाच्या तरी मदतीने तुम्हाला चांगले पैसे मिळतील. विविध मार्गांनी फायदे होतील. थोडा संयम ठेवलेला बरा. नातेवाईकांशी संबंध राहतील. मालमत्तेच्या कामात यश मिळेल. कमिशनच्या कामातून लाभ होईल. अधिकारी व्यक्तींचा घरात वावर राहील. आपल्या मर्जीप्रमाणे वागाल.

वृषभ (Taurus): कागदपत्रे वाचून मगच सही करा. तुमच्या निष्काळजीपणाचा विरोधक फायदा घेऊ शकतात. मनातील चुकीच्या विचारांना खतपाणी घालू नका. आपली कला इतरांसमोर सादर करता येईल. मदतीचा हात सढळ ठेवाल. काहींना भेटवस्तू मिळतील. आनंदी दृष्टिकोन ठेवून वागावे. बदलाकडे सकारात्मकतेने पाहावे. कामातील बदल जाणून घ्यावेत. तुम्ही निश्चिंत राहाल.

Advertisement

मिथुन (Gemini) : शिक्षणासाठी आजचा दिवस चांगला आहे, मेहनतीनुसार यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जायची योजना यशस्वी होईल. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासात अनोळखी लोकांशी सावधपणे व्यवहार करा. तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक केले जाईल. वैचारिक स्थिरता ठेवावी. मानसिक व्यग्रता जाणवेल. महत्वाच्या ग्रंथांचे वाचन कराल.

कर्क (Cancer) : नवीन मैत्री तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरेल. तुमच्यामध्ये काम करण्यासाठी नवीन ऊर्जा संचारेल. प्रवास टाळलेले बरे राहील. वाहन जपून चालवा. घरात सामान्य वातावरण राहिल. आर्थिक आवक चांगली राहिल. पत्नीशी थोडे वाद होतील. भागीदाराशी मतभेद संभवतात. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. जमिनीच्या कामातून फायदा मिळेल.

Advertisement

सिंह (Leo) : आजची सुरुवात चांगली होणार आहे. नवीन बिझनेस प्लॅनवर काम करण्यासाठी तुमच्यासाठी ही चांगली वेळ आहे. जीवनसाथीशी खुश राहून सगळं ठीक होईल. काही कारणाने गैरसमज होतील, पण जोडीदार तुम्हाला सांभाळून घेईल. व्यवसायात विक्री चांगली होईल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. मित्रांशी मतभेद. फसवणुकीपासून सावध रहा. मुलांचे धाडस वाढेल.

कन्या (Virgo) : . कामाच्या ठिकाणीही चांगली स्थिती दिसून येईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. आज तुम्ही तुमचे लक्ष चांगल्या कामावर केंद्रित कराल. भागिदारी व्यवसाय जपून करा. आराम करणे आवश्यक आहे. घरासाठी खर्च करावा लागेल. कामातील ऊर्जा वाढेल. हातात नवीन अधिकार येतील. नातेवाईकांची मदत घेता येईल. आवडीच्या गोष्टींमध्ये मन रमवावे.

Advertisement

तुळ (Libra) : कोणालातरी भेटण्याची संधी मिळेल. आज नवीन काम सुरू करणे फायदेशीर ठरेल. घरात पाहुण्यांच्या आगमनामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. गुप्त शत्रूंपासून सावध राहा. हाताखालील लोकांकडून सहकार्य मिळेल. सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्याल. स्त्रियांशी ओळख वाढेल. छंद जोपासण्यास वेळ देता येईल. तब्येतीची काळजी घ्या.

वृश्‍चिक (Scorpio) : आज तुम्हाला न्यायालयीन खटल्यातून मुक्तता मिळेल. कामात चांगले आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक सुख चांगले असेल. मुलांच्या यशाच्या गोष्टी कानावर पडतील. नोकरीता प्रगती होईल. थोडे वादही होतील, घरात संमिश्र परिस्थिती राहिल. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. सहवासातून मैत्री घट्ट होईल. जवळचा प्रवास घडेल. क्षुल्लक गोष्टींवर प्रतिक्रिया देणे टाळा.

Advertisement

धनु (Sagittarius) : तुमच्या कार्यक्षेत्रात मोठा बदल होऊ शकतो. आज तुमची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत जाईल. मुलांना चांगल्या संधी चालून येतील. त्यांच्या प्रगतीचा आढावा घ्या. त्यांना काही अडचणी असतील तर समजून घ्या. कामाचे योग्य नियोजन कराल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. घरातील वातावरण खेळीचे राहील. भाग्याची साथ मिळेल.

मकर (Capricorn) : आजचा दिवस शुभ राहील. कामात यशासह लाभ होईल. आज तुम्हाला अस्वस्थ वाटेल. तुमचे खराब आरोग्य तुमच्या अस्वस्थतेचे कारण असेल. काहींना प्रवास करावा लागेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहिल. आकर्षणाला बळी पडू नका. घराचे सुशोभीकरण काढाल. कामाचे योग्य नियोजन कराल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. व्यवसायात भरभराट होईल.

Advertisement

कुंभ (Aquarious) : आज भाग्य तुमच्या सोबत आहे. नोकरीच्या ठिकाणी चांगले यश मिळेल. आज तुम्ही कौतुकास पात्र असाल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. त्यात आपल्याला फायदा होईल. घरी पाहुणे येतील, खाण्यापिण्याची चंगळ राहिल. घरातील वातावरण खेळीचे राहील. जवळचा प्रवास घडेल. शांततेचे धोरण स्वीकारावे. सामुदायिक गोष्टींमध्ये सावधतेने वागावे.

मीन (Pisces) : तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या कामाच्या योजना पूर्ण कराल. इतरांसोबत मिळून केलेल्या कामातही चांगला फायदा होईल. घरात किरकोळ कारणावरुन कुरबूर होईल. मुलांच्या मनातील भावना समजून घ्या. प्रगतीच्या दिशेने वाटचाल होईल. प्रवासात काळजी घ्यावी. प्रत्येक काम अगदी सहजतेने पूर्ण कराल. आध्यात्मिक बळ वाढवावे. जबाबदारीची जाणीव ठेवाल.

Advertisement