SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राज्यातील शिक्षकांसाठी सर्वात मोठी बातमी, शाळा सुधारण्यासाठी सरकारकडून विविध घोषणा..

कोरोनाचे संकट कमी झाल्याने राज्यातील शाळा आता सुरु झाल्या आहेत. मात्र, या महामारीमुळे गेली दोन वर्षे विद्यार्थ्यांनी शाळेचे तोंडही पाहिले नव्हते.. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात आले, मात्र त्याला अनेक मर्यादा येत होत्या. परिणामी, या दोन वर्षांत विद्यार्थांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले..

कोरोनामुळे झालेले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरुन यावे, तसेच सरकारी शाळांचा शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी (ता. 21) काही महत्वपूर्ण निर्णय घेतले.. विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं शिक्षण मिळावं, यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी विविध मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत.

Advertisement

सरकारकडून महत्वाच्या घोषणा
शाळांमधील मुलभूत सोयींसाठी राज्य सरकारकडून यंदा पहिल्यांदा जिल्हा नियोजनमार्फत (DPTC) पाच टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुलांना भौतिक सुविधा पुरवतानाच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीही राज्य सरकार काम करीत असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

– निजामकालीन शाळांसाठी यावर्षी एकूण 160 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
– आदर्श शाळांसाठी या वर्षी 54 कोटी, तर पुढील वर्षी 300 कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत.
– प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी ई-लायब्ररी आणि अभ्यासिका तयार करण्यात येणार आहे.
– यंदा विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर आणि लँग्वेज लॅबची सोय करण्यात येणार आहे.

Advertisement

– यंदा विभागीय स्तरावर ‘सायन्स सिटीज्’ तयार करण्यात येणार आहेत. तसेच ‘इंटिग्रेटेड’ आणि ‘मराठी- इंग्लिश’ अशा भाषांमध्ये अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे.
– शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश केला जाणार आहे.
– विद्यार्थ्यांना ‘गुड टच’ (good touch) आणि बॅड टच (bad touch) बाबत शिक्षण दिलं जाणार..

शिक्षकांसाठी मोठी घोषणा
दरम्यान, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षकांसाठीही मोठी घोषणा केली. शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांना ‘फिनलँड’ आणि ‘ऑस्ट्रेलिया’ या देशांमध्ये ट्रेनिंग दिलं जाणार असल्याची माहिती मंत्री गायकवाड यांनी दिली.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement