SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

चिमुकलीचा धुमाकूळ! पुष्पा चित्रपटातील ‘या’ गाण्याचं मराठी व्हर्जन तुम्ही पाहिलंय का..?

मागील काही दिवसांपासून अधिक चर्चेत असणारा दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन याची दाढीवर हात फिरवण्याची स्टाईल त्याच्या ‘पुष्पा’ चित्रपटामुळे भलतीच प्रकाशझोतात आली. आता अनेक जण यूट्यूबवर, इन्स्टाग्रामवर या चित्रपटातील गाण्याचे त्यांच्या शैलीत व्हिडीओ बनवत आहेत. आता असाच एक व्हिडिओ एका चिमुकलीनेही बनवला आहे.

पुष्पा चित्रपटातील चित्रपटातील खास बोल असलेली (Pushpa Movie Songs Lyrics) एक से बढकर एक गाणी आणि दाढीवर हात फिरवत अल्लू अर्जुनचे कडक डायलॉग्ज अनेक लोकांनी व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर सादर केले आणि ते व्हायरल देखील झाले. यामुळे पुष्पा चित्रपटातील गाणी गल्ली-गावात पोहोचली आहेत. यातच आता आणखी एकाची भर पडली आहे।

Advertisement

अनेकांनी या चित्रपटातली गाणी आपल्या (Pushpa movie Songs Whatsapp Status) व्हॉट्सॲप स्टेटस ला ठेवत इतरांचं देखील मनोरंजन केलंच यात शंका नाही. हे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाले आणि चित्रपट देखील हिट झाला. आता अजूनही या चित्रपटातील गाण्यांचं मराठी व्हर्जन करायचं काही थांबलं नाही.

एकाहून एक चित्रपट हिट देत श्रीवल्ली गाण्यानंत अभिनेत्री रश्मिका मंदानाने डान्स केलेल्या पुष्पा चित्रपटातील ‘सामी सामी’ या तेलगू गाण्याचे हिंदी व्हर्जन तर सगळ्यांनीच ऐकलं. पण आता मराठी व्हर्जनही समोर आलं आहे. हे व्हर्जन चक्क एका लहान मुलीने गायलं आहे. हे गाणं ज्या मुलीने गायलं आहे (pushpa movie song marathi version) तिचं नाव अनन्या मोहोड असं आहे.

Advertisement

पाहा व्हिडीओ :

चित्रपटाबद्दल थोडंसं…

Advertisement

‘पुष्पा : द राइज’ चित्रपट लाल चंदनाच्या तस्करीवर आधारित हे आपल्याला माहीतच असेल. ज्यात अभिनेता अल्लू अर्जुननं ‘पुष्पा’ ही व्यक्तीरेखा साकारली आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात त्याची प्रेयसी दाखवलेली अभिनेत्री रश्मिका मंदानाचीही मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट 17 डिसेंबरला प्रदर्शित झाला असून त्याच्या गाण्यांची क्रेझ अजूनही आहे. तेव्हापासून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला आहे. एवढंच नाही तर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतरही प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत तेवढंच प्रेम पाहायला मिळतंय.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement